कोकणात पडणारा दरवर्षी मुसळधार पाऊस आणि डोंफरच्या पायथ्याशी असलेले गाव अशी सगळीच धोकादायक परिस्थिती लक्षात घेता लक्षात घेता यापूर्वीच ग्रामस्थांना तेथून स्थलांतरित होण्यास सांगितले होते अशी माहिती इर्शाळवाडीच्या सरपंच रितू ठोंबरे यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन जवळ बोलताना दिली आहे. नवीन जागेसाठीचा प्रस्ताव करूया अशी विनंती यापूर्वीच ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आली होती, असे रितू ठोंबरे म्हणाल्या.
आमच्याच गावाजवळ शंभर एकर एक परिसर आहे. त्या ठिकाणी आपण या इर्शाळवाडीला नवीन घरांचा स्थलांतराचा प्रस्तावही तयार करण्याचे काम सुरू केले होते. पण, या ठिकाणी अशी काही घटना घडेल याची सुतराम कल्पना आणि शक्यता तिथल्या परंपरागत राहायला असेलल्या ग्रामस्थांनाच नव्हे तर आम्हाला देखील नव्हती अशीही माहिती सरपंच ठोंबरे यांनी दिली.
पण परंपरागत त्यांची घरे तिथे असल्याने ग्रामस्थ तिथून हलण्यास राजी नव्हते. मात्र, आत्ताची नवीन पिढी आहे ती काम धंदानिमित्त व्यवसायानिमित्त बाहेर राहते आहे. रात्री घडलेली घटना ही अक्षरशः मन सुन्न करणारी अशीच आहे. मात्र, या सगळ्या मोठया प्रसंगांमध्ये आम्ही त्यांच्यासोबतच कायम आहोत त्यांना जी काही मदत लागेल ती मदत ग्रामपंचायत प्रशासनाकडून केली जाईल अशी ग्वाही चौक गावच्या सरपंच रितू ठोंबरे यांनी दिली आहे.
या किल्ल्याच्या पायथ्याशी जी लोकं परंपरागतरीत्या छोटी दुकानाला लावतात आणि त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो त्यांच्यासाठी आम्ही शासनाच्या टीबीडी योजनेत प्रस्ताव केले असून या योजनेतून त्याला दरवर्षी मदत दिली जाते. आपण या परिसरात कालच जाऊन आलो होतो. हा सगळा भाग अतिशय उंचावर आहे आणि मुख्य गावापासूनही लांब आहे त्यामुळे आपण त्या सगळ्याना गावाजवळ वास्तव्यासाठी येण्याची विनंती यापूर्वीच केली होती असे ठोंबरे यांनी सांगितले.