मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्यासह ९ जण मंत्रिपदाची शपथ घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले होते. त्याचदिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती. महाराष्ट्रामधील फुटीचं लोण आता नागालँडमध्ये पोहोचलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नागालँंडमधील आमदार अजित पवार यांच्या गटात दाखल झाले आहेत. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार होते. आता या सात आमदारांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

नागालँडमध्ये एनडीपीपी आणि भाजपचं सरकार आहे. राष्ट्रवादीचे तिथे ७ आमदार निवडून आले होते. नागालँड राष्ट्रवादीच्या आमदारांकडे विरोधी पक्षात बसण्याची संधी होती. मात्र, नागालँडमधील आमदारांनी तिथल्या सरकारला पाठिंबा देण्याची निर्णय घेतला होता. देशाच्या सीमाभागातील राज्य असल्यानं तो निर्णय घ्यायला संमती दिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आलं होतं.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता पुढची लढाई निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेलेली आहे. निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाकडे द्यायचा या संदर्भातील निर्णय घेऊ शकतो. यावेळी आमदारांचं बळ कुणाच्या बाजूनं असणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. नागालँडच्या आमदारांनी राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांची भेट घेत अजित पवार यांना पाठिंबा देत असल्याच जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे नागालँड राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या पत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल असा उल्लेख केला आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर, रोहित शर्माने कोणाला पदार्पणाची संधी जाणून घ्या…

शरद पवार यांच्या गटाला अजून एक धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आमदारांमध्ये दोन गट पडले आहेत. काही आमदारांनी अजित पवारांसोबत तर काही आमदारांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. काही आमदारांनी मात्र त्यांची भूमिका जाहीर केलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी विधिमंडळ अधिवेशनात देखील उपस्थिती दर्शवलेली नाही. निवडणूक आयोगातील लढाईसाठी आमदारांची संख्या निर्णायक ठरणार असताना नागालँडच्या आमदारांनी अजित पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतल्यानं शरद पवार यांच्या गटाला आणखी एक धक्का बसला आहे.
कोकण-पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा रघुवीर घाट बंद करण्याचे आदेश; ३१ जुलैपर्यंत पर्यटकांना जाण्यास मज्जाव
दरम्यान, शरद पवार यांच्या गटाकडून नागालँडच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या निर्णयावर काय भूमिका घेतली जाणार हे पाहावं लागणार आहे.

गुड न्यूज! ऐतिहासिक १०० व्या कसोटीपूर्वी रोहित शर्मासाठी आनंदाची बातमी, पाहा असं काय घडलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here