बिहारमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील ही घटना आहे. दांडखोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रायपूर वॉर्ड क्रमांक १० मध्ये १२ जुलै रोजी रात्री उशिरा ही घटना घडली. तौसिफ असं या मुलाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तौसिफची आई रुखसाना आणि तिचा प्रियकर नौशाद यांना अटक केली आहे. ज्या धारदार चाकूने तौसिफचा गळा चिरून खून केला होता तोही जप्त करण्यात आला आहे.
संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना मुख्यालयाच्या डीएसपी रश्मी यांनी सांगितले की, १३ जुलै रोजी घडलेल्या घटनेनंतर तौसिफचे वडील मोहम्मद कौम अन्सारी यांच्या वक्तव्यावरून या प्रकरणात दोघांनाही अटक करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना तौसिफची आई रुखसाना ही खरी गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.
अवैध प्रेमसंबंध उघड होईल या भीतीने त्यांनी तौसिफची हत्या केली. दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा मान्य केला आहे. तौसिफला त्याची आई आणि तिचा प्रियकर नौशाद यांच्यातील अवैध संबंधाची माहिती होती. याबाबत त्यांनी वडिलांकडे तक्रारही केली होती. मात्र, त्या रात्री घरी कोणी नसताना नौशाद पुन्हा एकदा तौसीफची आई रुखसाना यांना भेटण्यासाठी घरी पोहोचला होता. यादरम्यान तौसिफने दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं. प्रकरण निवळण्यासाठी नौशादने रुखसाना समोरच धारदार शस्त्राने तौसिफचा गळा चिरून खून केला.