देशात झाली असून, ही संख्या आता प्रति दहा लाख लोकांच्या मागे २६ हजार ६८५ इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत तीन कोटी ७० लाख करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर संसर्गाच्या दरातही घसरण झाली असून, हा दर ८.६० टक्क्यांवर आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिली आहे.
देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट म्हणजेच तपासणी, रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा तपास करणे आणि संसर्ग झालेल्या रुग्णांच्या उपचारांवर लक्ष केंद्रित करणे यावर भर असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. करोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या आता २४ लाख चार हजार झाली आहे. तसेच झाली असून, तो १.८४ टक्क्यांवर आला आहे.
दैनंदिन चाचण्यांमध्ये वाढ करण्याच्या भारताच्या संकल्पानुसार आतापर्यंत तीन कोटी ६८ लाख २७ हजार ५२० जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. सोमवारी केलेल्या नऊ लाख २५ हजार ३८३ जणांच्या चाचण्यांनंतर हा आकडा प्रति दहा लाख लोकसंख्येमागे वाढून २६ हजार ६८५ इतकी झाला आहे, असे आरोग्य मंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
सुरुवातीला केवळ पुण्यात एका प्रयोगशाळेने सुरुवात झाल्यानंतर आता देशात यांची संख्या वाढून एक हजार ५२४ इतकी झाली आहे. यापैकी ९८६ या सरकारी, तर ५३८ प्रयोगशाळा खासगी आहेत.
वाचा :
वाचा :
रुग्णसंख्या ३१,६७,३२३
देशात मंगळवारी दिवसभरात ६० हजार ९७५ नवे रुग्ण आढळले असून, यामुळे आता बाधित रुग्णांची एकूण संख्या ३१ लाख ६७ हजार ३२३ इतकी झाली आहे. तर या आजारावर मात केलेल्या रुग्णांची संख्या देशात २४ लाख चार हजार ५८५ इतकी झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ८४८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत मरण पावलेल्या रुग्णांची संख्या ५८ हजार ३९० इतकी झाली आहे. देशात सध्या सात लाख चार हजार ३४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
वाचा :
वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times