श्रीनगर : १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या जम्मू काश्मीरच्या पुलवामा भागात घडवून आणल्या गेलेल्या दहशतवादी हल्ला प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून () १३ हजार ५०० पानांचं आरोपपत्र ( Chargesheet) दाखल करण्यात आलंय. या आरोपपत्रात मसूद अजहर तसंच त्याचा भाऊ यांच्या नावाचा समावेश आहे. या आरोपपत्रात एनआयएकडून अनेक धक्कादायक खुलासेही केले आहेत. १४ फेब्रुवारी घडवून आणलेला हा हल्ला अगोदर ६ फेब्रुवारी २०१९ रोजी करण्याची योजना दहशतवाद्यांनी आखली होती, असा महत्त्वाचा खुलासा यात करण्यात आलाय. तसंच एका दुकानदाराकडून सीआरपीएफचा ताफा या भागातून जाणार असल्याचा सुगावा दहशतवाद्यांना लागला होता, असाही यात उल्लेख करण्यात आलाय.

पुलवामामध्ये फेब्रुवारी २०१९मध्ये झालेल्या () दाखल केले असून, त्यात ”चा म्होरक्या मौलाना , त्याचा भाऊ अब्दुल रौफ असगर, मारला गेलेला दहशतवादी महंमद उमर फारुख, आत्मघातकी हल्ला करणारा अदील अहमद दार आणि पाकिस्तानातील अन्य दहशतवाद्यांची नावे यात आहेत. त्याशिवाय, अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांची नावेही या आरोपपत्रात आहेत.

संबंधित बातमी :

वाचा :

पाकिस्तानी नागरिकांची नावं

मोहम्मद अब्बास रथेर, वैज उल इस्लाम, शाकीर बशीर, बिलाल अहमद कुच्चे, मुदसिर अहमद खान, समीर अहमद डार, अशाक अहमद नेंगरू, आदिल अहमद डार, पीर तारीक अहमद शाह आणि त्याची मुलगी इन्शा जहाँ यांचीही नावे आरोपपत्रात आहेत.आरोपपत्रात ज्या २० जणांना आरोपी बनवण्यात आलंय. त्यात पाकिस्तानच्या काही नागरिकांच्या नावाचाही उल्लेख आहे. मसूद अझर अल्वी, रौफ असगर अल्वी, अम्मार अल्वी, मोहम्मद इस्माइल, मोहम्मद कामरान अली आणि कारी यासिर या पाकिस्तानी नागरिकांचीही नावे आरोपपत्रात आहेत.

…पण बर्फामुळे हायवे बंद झाला

आरोपपत्रामध्ये पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर आणि रौफ अझगर यांची नावं आहेत. पुलवामामध्ये बसवर हल्ल्यासाठी वापरलेले आरडीएक्स पाकिस्तानातून आले होते, असंही ‘एनआयए’च्या तपासात समोर आलंय. ६ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड उमर फारुक आणि त्याची टीम हल्ल्यासाठी तयार होते. यासाठी इको कारमध्ये स्फोटकांनी भरलेले दोन ड्रमही ठेवण्यात आले होते. यातील एका ड्रममध्ये १६० किलो आणि दुसऱ्या ड्रममध्ये ४० किलो स्फोटकं होती. परंतु, हल्ला करण्याआधीच काश्मीरमध्ये बर्फवर्षाव सुरू झाला. त्यामुळे हायवेदेखील बंद झाला होता.

इतर बातम्या :

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here