नवी दिल्ली: भारताच्या एका माजी खेळाडूने आई आणि पत्नीची केल्याची खळबजनक घटना समोर आली आहे. या खेळाडूने देशासाठी पदक देखील मिळवले होते. जाणून घेऊयात काय झाले.

वाचा-
या भारताच्या माजी अॅथलेटला अमेरिकेतील पेसिलवेनिया येथे दुहेरी हत्या केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अमेरिकेतील स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार सिंहने सोमवारी स्वत: पोलिसांना फोन करून आई आणि पत्नीची हत्या केल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा-
६३ वर्षीय इकबाल सिंगने १९८३ साली कुवेत येथे झालेल्या आशियन अथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत शॉट पुटमध्ये देशाला कांस्य पदक जिंकून दिले होते.

सिंग पंजाबमधील होशियारपूर येथील रहिवाशी असून ८०च्या दशकात भारताचे आघाडीचे शॉट पुट खेळाडू होते. १८.७७ मीटर ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. १९८८ मध्ये नवी दिल्लीत सिंग यांनी ही कामगिरी केली होती. भारताच्या ऑल टाइम लिस्टमध्ये सिंग पहिल्या २० जणांमध्ये येतात.

वाचा-
१९८०च्या करिअर संपल्यानंतर ते अमेरिकेला शिफ्ट झाले. त्यांनी टाटा स्टील आणि पंजाब पोलिस दलात काम केले होते.

या घटनेबद्दल बोलताना सिंग यांचे जवळचे मित्र यांनी सांगितले की, मला या घटनेवर विश्वासच बसत नाही. त्याचा स्वभाव मनमिळावू होता. मी अमेरिकेत त्यांच्या घरी गेले होते. त्याची पत्नीचा स्वभाव चांगला होता. आईचे वय ९०हून अधिक असेल.

वाचा-

नेमके काय घडले याची मला कल्पना नाही. पण केल्या काही दिवसांपासून ते तणावात होते आणि औषधे घेत होते. त्याची मुले देखील स्वत:च्या पायावर उभी आहेत, असे सिंग यांचे मित्र म्हणाले.

वाचा-
आई आणि पत्नीची हत्या केल्यानंतर सिंग यांनी स्वत:ला देखील जखमी केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here