किरण खेर यांनी दोन लग्न केली हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. पण फार कमी लोकांना माहीत आहे की अनुपम यांनीही दोन लग्न केली आहेत. १९९२ मध्ये एका मासिकाने अनुपम यांच्या आयुष्यावर एक लेख लिहिला होता. यात त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव मधुमालती होतं. लग्नाच्या काही वर्षांनंतर दोघांच्या नात्यात दरी निर्माण झाली आणि दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. १९८५ मध्ये त्यांनी अभिनेत्री किरण खेर यांच्याशी लग्न केलं.
आपल्या प्रेमाबद्दल बोलताना किरण यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, “मी मुंबईला आले, मी गौतमशी लग्न केलं आणि त्याच्या काही दिवसांनंतरच आम्हाला जाणवू लागलं की हे लग्न फारसं टिकणार नाही. मी आणि अनुपम तेव्हाही चांगले मित्र होतो. एकत्र नाटक करत होतो. मला आठवतंय की आम्ही नादिरा बब्बर यांच्या नाटकासाठी कलकत्त्याला गेलो होतो. त्या प्रवासात मला कळलं की आमच्यात असलेलं बंधन वेगळं आहे.” किरण यांनी गौतम बॅरीशी लग्न केलं होतं. त्यांच्यापासून किरण यांना सिकंदर खेर हा मुलगाही आहे.
७ मार्च १९५५ मध्ये शिमल्यात काश्मिरी पंडित कुटुंबात जन्मलेल्या यांचं सुरुवातीचं आयुष्य फार संघर्षमयी होतं. शिमला येथून शिक्षण पूर्ण झाल्यावर अभिनेता होण्याच्या इच्छेने ते मुंबईत आले. १९८५ मध्ये अनुपम खेर यांना पहिला सिनेमा मिळाला. ‘सारांश’ सिनेमात त्यांनी ६५ वर्षांच्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेचं मोठ्या प्रमाणात कौतुकही झालं होतं. या सिनेमानंतर त्यांनी मागेवळून पाहिलं नाही.
त्यानंतर अनुपम यांनी एकामागून एक हिट चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. अनुपम खेर यांना १९८८ मध्ये आलेल्या ‘राम लखन’ या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. यानंतर अनुपम यांनी पाच वेळा ‘बेस्ट कॉमेडियनसाठी फिल्मफेअर अवॉर्ड’वर आपलं नाव कोरलं. अनुपम खेर यांनी ‘लम्हे (१९९१)’, ‘खेल (१९९२)’, ‘डर (१९९३)’, ‘दिलवाले दुल्हनी ले जाएंगे (१९९५)’, ‘विजय (१९८८)’ यासारख्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times