वॉशिंग्टन: करोनाबाधितांच्या उपचारांसाठी प्लाज्मा थेरेपीचा वापर करण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने जाहीर केल्यानंतर अमेरिकेत मोठा वाद सुरू झाला आहे. अमेरिकेतील तज्ञांनी प्लाज्मा थेरेपीला विरोध केल्यानंतर आता अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त स्टीफन हॉन माफी मागितली आहे. प्लाज्मा उपचार पद्धतीबाबतच्या फायद्यांबाबत अधिक दावा केल्याबद्दल त्यांनी ही माफी मागितली आहे.

अमेरिकन सरकारने प्लाज्मा थेरेपीला मान्यता दिल्यानंतर अमेरिकेतील तज्ञांनी आणि डॉक्टरांनी नाराजी व्यक्त करत विरोध दर्शवला होता. ट्रम्प यांनी या निर्णयाला ऐतिहासिक म्हटले होते. तर, या उपचाराची गुणवत्ता व इतर फायद्याबाबत अधिक संशोधन होणे आवश्यक असल्याचे मत समोर येत आहे. ट्रम्प यांचा निर्णय हा राजकीय असल्याची टीका करण्यात आली.

वाचा:

करोनाबाधितांवर प्लाज्माचा वापर केल्यास १०० पैकी ३५ बाधितांचे प्राण वाचू शकतात असा दावा करण्यात आला होता. हॉन यांनी ट्रम्प या निर्णयाचे समर्थनही केले होते. हा निष्कर्ष मायो क्लिनिकच्या सुरुवातीच्या निष्कर्षांपेक्षाही अधिक होता . या ३५ टक्क्यांच्या आकड्यावरून शास्त्रज्ञ आणि काही माजी एफडीए अधिकाऱ्यांनी एफडीए आणि सरकारवर टीका केली होती. ही आकडेवारी अवाजवी असून ती दुरुस्त आणि आणखी तथ्यांच्या आधारे समोर येणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.

वाचा:

हॉन यांनी सांगितले की, रविवारी प्लाज्मा उपचार पद्धतीबाबत मी केलेल्या टिप्पणीसाठी माझ्यावर टीकाही करण्यात आली. ही टीका योग्य असून मी आकड्यांमधून जोखीम कमी असल्याचे समजते. मात्र, पूर्णपणे आजार बरा होतो असे नाही, असे वक्तव्य करायला हवे होते. आता प्लाज्मा उपचार पद्धतीवर देखरेख ठेवण्यात येणार असून आवश्यकता भासल्यास या उपचार पद्धतीला मागे घेण्यात येईल असेही हॉन यांनी स्पष्ट केले. एफडीएने मायो क्लिनिकने त्यांच्या देशभरातील रुग्णालयातून एकत्रित केलेल्या आकडेवारीच्या आधारे करोनाबाधितांवर प्लाज्माचा वापर करण्याची परवानगी दिली.

वाचा:

कंवलसेट प्लाज्मा म्हणजे काय?

कोणताही विषाणू शरीरावर हल्ला करतो त्यावेळी त्या व्यक्तीच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती विषाणूशी लढण्यासाठी अॅण्टीबॉडीज प्रोटीन विकसित करते. त्याशिवाय विषाण संसर्गबाधित व्यक्तीच्या रक्तात आवश्यकतेहून अधिक अॅण्टीबॉडीज विकसित झाल्यास विषाणूमुळे होणारा आजार बरा होऊ शकतो. कंवलेसंट प्लाज्मा थेरेपीमुळे निरोगी व्यक्तीची रोग प्रतिकारक शक्ती क्षमता आजारी असलेल्या व्यक्तीच्या शरीरात जाते. प्लाज्मा थेरेपीमुळे बरे झालेल्या लोकांच्या अॅण्टीबॉडीज असलेल्या रक्ताचा वापर आजारी व्यक्तींच्या उपचारासाठी करण्यात येतो.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here