पुणे: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्याला पुण्यात सुरुवात झाली आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. गुवाहाटी येथील पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द झाला होता. इंदूर येथील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने सात गडी राखून विजय मिळवला होता. विराटच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ अंतिम सामन्यासह मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल तर श्रीलंका अंतिम सामन्यासह मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.
LIVE अपडेट-
>> श्रीलंकेने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times