बुधवारी दुपारी २.३० वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी आपण या बैठकीला उपस्थित राहू शकत नसल्याचं कळवलंय. काँग्रेसकडून अनेकदा आग्रह करण्यात आल्यानंतरही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी होणार नसल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे एका वेगळ्या चर्चेला आणि नव्या वादाला तोंड फुटलंय.
वाचा :
वाचा :
वाचा :
उद्या गुरुवारी २७ ऑगस्ट रोजी ”ची एक बैठक होणार आहे. यापूर्वी काँग्रेसच्या बैठकीत सामूहिकरित्या भूमिका घेण्यासाठी काँग्रेसशासित चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसहीत उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी आणि तीन काँग्रेसेतर मुख्यमंत्र्यांनाही संपर्क करण्यात आला. या बैठकीत जीएसटी परिषदेच्या बैठकीत जीएसटीशी निगडीत राज्यांच्या पैशांची थकबाकी वेळेवर देण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव टाकण्यासाठी रणनीती तयार करण्याचा संकल्प आहे.
सोबतच काँग्रेसच्या या बैठकीत देशभरातील जेईई-एनईईटी परीक्षा घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी या अगोदरपासून या प्रश्नावर सक्रीय आहेत. तसंच सोमवारी नेते राहुल गांधी यांनी ‘आज लाखो विद्यार्थी सरकारला काही सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. एनईईटी, जेईई परीक्षेसंदर्भात त्यांचं म्हणणं ऐकलं गेलं पाहिजे आणि सरकारनं त्यावर सार्थ तोडगाही काढायला हवा’ असं म्हणत हा मुद्दा उचलून धरला होता.
वाचा :
वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times