विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर मंगळवारी ते पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेसच्या भावी अध्यक्षपदाबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भावी अध्यक्ष गांधी कुटुंबातील की बाहेरील, यावरून पक्षात दोन तट पडले आहेत. राज्याराज्यातील नेतेही आपापली मते मांडत आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेतेही यात मागे नाहीत. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आणि मदत व पुनर्वसन मंत्री यांनी यांच्या नावाला ठाम पाठिंबा दिलाय. वडेट्टीवार यांनी तर त्याही पुढं जाऊन वक्तव्य केलंय. अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधी यांनी सांगितल्यास राज्यातील सत्ताही सोडू, असं म्हटलंय. त्यावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे.
वाचा:
वडेट्टीवारांच्या या वक्तव्याबद्दल फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले, ‘या सगळ्याकडं आता आम्ही फार लक्ष देत नाही. एका अध्यक्षपदावरून त्यांच्यात इतके वाद सुरू आहेत. सोनिया गांधींना अध्यक्षपदी राहायचं नाहीए. पण त्यांनाच राहावं लागतंय. जे अध्यक्ष पदाविषयी ठरवू शकत नाहीत, ते पुढचं काय ठरवणार? इतक्या मोठ्या पक्षाची ही अवस्था का झाली याचं आत्मचिंतन त्यांनी करायला हवं.’
‘महाविकास आघाडीच्या सरकारबद्दल म्हणाल तर या सरकारमध्ये प्रचंड अंतर्विरोध आहे. कुणाचा पायपोस कुणात नाही. त्यामुळं सरकार जितके दिवस चाललंय, तितके दिवस चालेल. एक दिवस जाईल. शेवटी ही अनैसर्गिक आघाडी आहे. ती नैसर्गिक नाही. अशी आघाडी देशाच्या राजकारणात कधीच फार काळ चाललेली नाही,’ असं फडणवीस म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times