अंबरनाथ : जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातले असतानाच, सर्वाधिक पावसाची नोंद असलेल्या अंबरनाथ तालुक्यात जोरदार पाऊस कोसळल्याने बुधवारी अंबरनाथ शहरातील अनेक भागात आलेल्या पुरामुळे नाल्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर उल्हासनगर हद्दीतील वालधुनी नदीत सापडला आहे. राहील शेख (वय २८, रा. अंबरनाथ ) असे नदी पात्रात सापडलेल्या मृत तरुणाचे नाव आहे.

ठाणे जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून मुसळधार पावसामुळे सर्वच नद्यांना पूर आला आहे. शिवाय अनेक शहरातील नाले. ओढे तुडंब भरून वाहत असून बुधवारी तर बदलापुर, अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातील मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती.

पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी घटना, मालेगावात गुप्त धनासाठी ९ वर्षांच्या मुलाचा नरबळी, भौंदू बाबासह ४ अटकेत
याच दरम्यान अंबरनाथच्या जुना भेंडी पाडा परिसरात राहणारा २८ वर्षीय राहील शेख हा तरुण पोहण्यासाठी नाल्यात उड्या मारत होता. मात्र पुरामुळे नाल्याच्या पाण्याला प्रवाह जास्त असल्याने तो वाहत वालधुनी नदी पत्रात गेला होता.

धक्कादायक! महिलांची अंतर्वस्त्र चोरायचा, ती परिधान करून महीलांसमोर करायचा अश्लील डान्स
दोन दिवस प्रशासन त्याचा शोध घेत होते, अखेर दोन दिवसानंतर राहीलचा मृतदेह वालधुनी नदीत आढळून आला. यासंदर्भाची माहिती स्थानिकांनी उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत हा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरणीय तसपाणीसाठी मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात रवाना केला. तर दुसरीकडे राहीलचा मृतदेह सापडल्याने त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

सातपुडा पर्वत रांगांमध्ये ढगफुटी, मुक्ताईनगरमध्ये हाहाकार, मातीचा बंधारा फुटून सहा गावांमध्ये शिरले पाणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here