सांगलीपासून १३४ किलोमीटर अंतरावर कर्नाटकातील विजापूर आणि बागलकोट या दोन जिल्ह्यात कृष्णा नदीवर आहे. या धरणाचे काम २००५ मध्ये पूर्ण झाल्यानंतर त्याचवर्षी महाराष्ट्रात आणि कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा सामना करावा लागला. यानंतर सातत्याने दक्षिण महाराष्ट्रातील पुराचा ठपका अलमट्टी धरणावर ठेवला जात आहे. सध्या धरणाच्या भिंतीची उंची ५१९ मीटर आहे, तर १२३ टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता आहे. धरणाची उंची आणखी पाच मीटरने वाढवण्याचे प्रयत्न कर्नाटक सरकारकडून सुरू आहेत. मात्र, उंची वाढवल्याने याचा मोठा फटका सांगलीपर्यंतच्या गावांना बसू शकतो. याशिवाय पावसाळ्यात गंभीर पूरस्थिती उद्भवू शकते, असा काही तज्ज्ञांचा दावा आहे. याच कारणांमुळे महाराष्ट्र सरकारने अलमट्टीच्या उंचीला विरोध केला आहे. सुप्रीम कोर्टानेही उंची वाढवण्यास परवानगी दिलेली नाही.
वाचा:
महाराष्ट्राच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून पुन्हा एकदा कर्नाटक सरकारकडून अलमट्टीची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेपर्यंत भरलेल्या धरणातील पाण्याचे पूजन कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या हस्ते झाले. यानंतर बोलताना त्यांनी अलमट्टीची उंची वाढवण्याचा पुनरुच्चार केला. यासाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अपवादात्मक परिस्थितीतच गंभीर पुराचा धोका उद्भवू शकतो. अन्यवेळी हे धरण अतिशय उपयुक्त असल्याने उंची वाढवणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र, पाच मीटर उंची वाढवल्याने तब्बल ७७ टीएमसीने पाणी क्षमता वाढणार आहे. या पाण्यामुळे नदीकाठावरील हजारो गावांना जलसमाधी मिळेल. धरणातील बकवॉटरचा परिणाम सांगलीपर्यंत जाणवेल. पावसाळ्यात सांगली आणि कोल्हापुरात पूरस्थिती गंभीर बनेल, अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. यामुळेच महाराष्ट्र सरकारकडून याला विरोध होत आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times