मत्स्योदरी देवी हे जालना जिल्ह्याचे आराध्यदेवत असल्याने समाजाच्या धार्मिक भावना दुखावून समाजामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व हिंदु संघटना यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत मा. पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले होते. मा. पोलीस अधीक्षक यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना सुचना दिल्या होत्या. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी,कर्मचारी यांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. पथकातील अधिकारी हे गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करित होते. परंतु, मंदीर परिसरातील CCTV कॅमेरे बंद असल्याने तसेच कोणताही तांत्रिक पुरावा नसल्याने आरोपींना निष्पन्न करणे जिकरीचे झाले होते.
पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हा दाखल झाल्यापासून सतत अंबड शहर व परिसरात फिरुन आरोपींची माहिती घेत असतांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा शिवाजी सुभाष बरडे (रा. काजळा ता. बदनापुर जि. जालना) याने त्याच्या इतर साथीदारासह गुन्हा केल्याची माहिती मिळाली. काजळा येथून त्याला ताबडतोब ताब्यात घेवून गुन्ह्याबाबत आणि त्याच्या इतर साथीदाराबद्दल पोलिसी खक्यात चौकशी करताच त्याने त्याचे साथीदार अशोक विठ्ठल भोसले (वय २७ वर्ष रा. काजळा ता. बदनापुर जि.जालना) आणि गणेश विश्वनाथ गायकवाड (वय ४० वर्ष रा. काजळा ता. बदनापुर जि.जालना) व इतर दोन अश्या ५ जणांनी मिळुन मध्यरात्रीच्या वेळी गुन्हा केल्याची कबुली दिली.
त्यानंतर इतर दोन आरोपींना काजळा येथुन वेगवेगळ्या ठिकाणी शिताफीने ताब्यात घेऊन त्यांचेकडुन मत्स्योदरी देवीचे मंदीरातील दान पेटीतील चोरलेली एकुण रक्कम ४३ हजार रुपये रोख जप्त करण्यात आलेले आहेत. नमुद तिन्ही आरोपींना मुद्देमालासह पोलीस ठाणे अंबड यांच्या ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. चैतन्य कदम हे करित आहेत. गुन्ह्यातील इतर दोन आरोपींचा शोध घेणे चालु आहे.
या घटनेतील आरोपी शिवाजी सुभाष बरडे याच्या विरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. डॉ. राहुल खाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री चैतन्य कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर खनाळ, सपोनि श्री आशिष खांडेकर, पोउपनि श्री प्रमोद बोंडले, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कामटे, फुलचंद हजारे, विनोद गदधे कृष्णा तंगे, जगदीश बावणे, रुस्तुम जैवाल, दत्तात्रय बाडे, सागर बावस्कर, सचिन चौधरी, विजय डिक्कर, लक्ष्मीकांत आडेप, देविदास भोजणे, किशोर पुंगळे, रवि जाधव, भागवत खरात, सचिन राऊत, कैलास चेके, योगेश सहाणे, धिरज भोसले, चंद्रकला शडमल्लु चालक धम्मपाल सुरडकर, रमेश पैठणे सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे.