युएईमध्ये आयपीएल खेळवण्याच्या दृषअटीने एक महत्वाचे पाऊल आता उचलले गेले आहे. आयपीएलमधील काही संघांतील खेळाडूंची करोना चाचणी करण्यात आली आहे. या खेळाडूंच्या करोना चाचणीचे अहवाल काय आले आहेत, ते पाहा…

आयपीएल खेळण्यासाठी आठवड्याभरापूर्वी आयपीएलमधील संघातील खेळाडू युएईसाठी रवाना झाले होते. त्यानंतर त्यांना सहा दिवस क्वारंटाइनमध्ये सहा दिवस ठेवण्यात आले होते. या सहा दिवसांमध्ये काही संघातील खेळाडूंच्या करोना चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत.

कोणत्या संघांतील खेळाडूंच्या करोना चाचण्या झाल्या…आयपीएलसाठी सर्वात आधी दोन संघ युएईला रवाना झाले होते. यामध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांचा समावेश होता. या दोन संघांतील सर्व खेळाडूंना सहा दिवस क्वारंटाइन केले होते. त्यानंतर या सर्वांच्या तीन वेळा करोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यांचे अहवालही आता समोर आले आहेत.

अहवाल काय सांगतो…किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांतील खेळाडूंच्या तीन करोना चाचण्या झाल्या. या तिन्ही चाचण्यांमधील खेळाडूंचे करोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे आयपीएलसाठी ही एक सकारात्मक गोष्ट असल्याचे म्हटले जात आहे.

आता खेळाडू काय करणार…किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांतील खेळाडूंचे करोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता त्यांना बायो-बबल सुरक्षेमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांतील खेळाडू आता सराव करू शकतात. युएईमध्ये जास्त उष्मा असल्यामुळे खेळाडूंनी सकाळी आणि संध्याकाळी सराव करायला पसंती दिली आहे. त्यामुळे आता किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स संघातील खेळाडू आयपीएलच्या सरावाला लागले असल्याचे समजते आहे.

यावर्षी आयपीएल ही युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. आयपीएल खेळण्यासाठी सर्व संघ युएईमध्ये दाखल झाले आहे. पण कोणत्याही संघाने अजूनपर्यंत सराव सुरु केलेला नाही. पण युएईमधील मैदानं मात्र सज्ज झालेली आहेत. काही दिवसांतच या मैदानात आयपीएलमधील खेळाडू सराव करताना दिसतील. युएईमध्ये तीन मोठी स्टेडियम्स आहेत. या तीन स्टेडियम्समध्येच आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत. आतापर्यंत या मैदानात काही आंतरराष्ट्रीय सामनेही झालेले आहेत. त्यामुळे खेळाडूंना ही मैदानं नवीन नाहीत. त्यामुळे आता या आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पडणार का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here