सातारा: पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात सणबूर येथे एकाच कुटुंबातील चार जणांचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाला होता. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी अनेक शक्यता डोळ्यासमोर ठेवून तपास सुरू केला. मात्र, या मृत्यूमागे घातपाताची शक्यता नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल. असं असलं तरी आनंदा जाधव यांच्या घरात लावलेल्या जनरेटचा धूर हेही चौघांच्या मृत्यूचे एक कारण असू शकते, अशी चर्चा सुरू आहे.

सणबूर येथील आनंदा जाधव यांच्यासह त्यांच्या पत्नी, मुलगा तसेच विवाहित मुलीचा शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवला आहे. त्याचा सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे ढेबेवाडी पोलिसांनी सांगितले.
अर्ध घर अंगावर, तरीही त्याने कुटंबातील ६ जणांना वाचवलं, तरुणाने सांगितला ‘त्या’ रात्रीचा थरारक अनुभव

रयत शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त शिक्षक आनंदा पांडुरंग जाधव, त्यांची पत्नी सुनंदा, मुलगा संतोष आणि विवाहित मुलगी पुष्पलता धस या चौघांचे मृतदेह शुक्रवारी सकाळी राहत्या घरी आढळले होते. गुरुवारी आनंदा जाधव यांना उपचारासाठी कराडला रुग्णालयात आणले आणि सायंकाळी त्यांना घरी सोडले होते. मात्र, आनंदा जाधव यांना श्वास घेण्यासाठी अडचण होत होती. घरात विजेची समस्या असल्याने पोर्टेबल ऑक्सिजन मशिनसाठी जनरेटरची व्यवस्था केली होती. जाधव यांच्या घराची रचना आणि त्यातच रात्रभर जनरेटर सुरू ठेवल्याने त्याच्या धुरामुळे घरातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊन झोपेतच या चौघांचा गुदमरून मृत्यू झाला असावा, अशी चर्चा आहे.

आम्ही खाली झोपड्या बांधल्या होत्या, पण वनविभागाने तोडून टाकल्या; इर्शाळवाडीतील दुर्घटना ग्रस्थ व्याकूळ!

शुक्रवारी रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर जाधव कुटुंबातील तिघांवर सणबूर येथे तर पुष्पलता धस यांच्यावर मंदुळकोळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here