आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा. कारण आतापर्यंत रोहितने मुंबईला तब्बल चारवेळा आयपीएलचे जेतेपद जिंकवून दिले आहे. पण रोहित हा आयपीएलमधला सर्वात यशस्वी कर्णधार कसा ठरला, जाणून घ्या रहस्य…

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीकडे पाहिले जाते. धोनीला आतापर्यंत आयपीएलमध्ये तीन जेतेपदे पटकावता आलेली आहे. पण रोहितने धोनीला मागे टाकत मुंबई इंडियन्सला चौथे जेतेपदही जिंकवून दिले होते. त्यामुळे आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून रोहितकडे पाहिले जाते.

रोहितबरोबर खेळणाऱ्या एका माजी क्रिकेटपटूने रोहितच्या नेतृत्वाचे रहस्य उलगडले आहे. हा माजी खेळाडू आहे झहीर खान. मुंबई इंडियन्सकडून झहीरही खेळला होता. त्यामुळे त्याला रोहितच्या नेतृत्वामधील बारकावे चांगलेच माहिती आहेत. त्यामुळे रोहितच्या नेतृत्वाचे रहस्य झहीरने एका व्हिडीओच्या माध्यमातून उलगडले आहे.

रोहितबाबत झहीर म्हणाला की, ” रोहितबाबत सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे तो खेळाडूंवर विश्वास ठेवतो. त्याचबरोबर खेळाडूंना त्यांच्याप्रमाणे रणनिती आखण्याची मुभाही देतो. त्याचबरोबर कठीण परिस्थितीही शांतपणे हाताळताना मी त्याला पाहिले आहे. त्याचबरोबर कोणत्या खेळाडूकडून काय आणि कशी कामगिरी करून घ्यायची, हेदेखील रोहितचा चांगले जमते. त्यामुळेच रोहित हा चांगला कर्णधार आहे.”

झहीर म्हणाला पुढे की, ” एक कर्णधार म्हणून रोहितने आम्हाला प्रभावित केले आहे. रोहित हा मैदानात एकदम शांत असतो. मैदानात तो खेळाचाच विचार करत असतो आणि खेळ त्याला चांगल्यापद्धतीने समजतो. मैदानात जेव्हा तणावाची किंवा दडपण येते तेव्हा रोहित शांतपणे ती परिस्थिती हाताळताना दिसतो. त्याचबरोबर रोहितकडे बऱ्याच रणनितीही असतात, त्याचा तो अवलंब करायचा प्रयत्न करत असतो.”

खेळाडूंसाठी सध्या सर्वात महत्वाचा आहे तो फिटनेस. यापूर्वी तुम्ही रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका यांचे काही व्हिडीओ पाहिले असतील. पण या दोघांचा हा व्हिडीओ खास आहे. कारण या व्हिडीओमध्ये रोहित आणि रितिका दोघे एकत्रितपणे व्यायाम करत असल्याचे पाहायला मिळत आहे. रोहित जसा व्यायाम करत आहे, तशीच रितिका त्याच्या बाजूला उभा राहून व्यायाम करत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ चाहत्यांनी पसंत केला असून तो चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here