मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावरून आरडीएक्स स्फोटकांनी भरलेला टॅंकर गोव्याच्या दिशेने येत असून यात पाकिस्तानी नागरिक आहेत, अशी माहिती देणारा फोन पोलिसांच्सा नियंत्रण कक्षात आला आणि सर्व यंत्रणा कामाला लागली. रायगड पोलिसांनी पाठलाग करुन हा टॅंकर अडवला आणि झाडाझडती घेतली. मात्र, संशयास्पद काहीच सापडले नसल्याचे मुंबई पोलिसांना कळवलं. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने खोटी माहिती देणाऱ्या निलेश पांडे याला शोधून काढले आहे.

पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शनिवारी मध्यरात्री एक फोन आला. फोन करणाऱ्याने एक पांढऱ्या रंगांचा टॅंकर मुंबई-गोवा महामार्गावरून गोव्याच्या दिशेने जात असून त्यामध्ये आरडीएक्स स्फोटकांचा साठा असल्याचं सांगितलं. मुंबई पोलिसांनी याबाबतची माहिती रायगड आणि सिंधूदुर्ग पोलिसांना दिली. पोलिसांनी मुंबई गोवा महामार्गावर गस्त वाढवून रायगड परिसरात टॅंकर ताब्यात घेतला. टॅंकर आणि त्यात असलेल्यांची कसून चौकशी करण्यात आली. मात्र संशयास्पद असेच काहीच आढळले नाही.

मॉलमध्ये गरम पाण्याचा पाईप फुटला, अनेक जण भाजले, चौघांचा मृत्यू, क्षणात होत्याचं नव्हतं
खोटी माहिती दिल्याचे कळताच मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा कामाला लागली. गुन्हे शाखा युनिट ७ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंत, जाधव, काळे, कदम याच्यासह पोलिसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करीत निलेश पांडे याला कांजुरमार्ग येथून शोधून काढले. निलेश याने याआधी देखील अनेकदा अशी खोटी माहिती दिल्याचे समोर आले आहे.

आजोबांच्या हातून नाल्यात निसटलेलं बाळ सापडल्याचे फोटो व्हायरल; नेमकं सत्य काय?

म्हणून दिली खोटी माहिती

भाईंदर परिसरात निलेश आपल्या स्कूटीवरून जात होता. दारूच्या नशेत स्कूटी चालविणाऱ्या निलेशला टॅंकरचा धक्का लागला. स्वतःची चूक असतानाही त्याने टॅंकर चालकाला धडा शिकविण्यासाठी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला. टॅंकरचा क्रमांक देऊन स्फोटकांबाबत खोटी माहिती दिली.

अर्ध घर अंगावर, तरीही त्याने कुटंबातील ६ जणांना वाचवलं, तरुणाने सांगितला ‘त्या’ रात्रीचा थरारक अनुभव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here