म. टा. वृत्तसेवा, उरण : इर्शाळवाडी येथील पीडित कुटुंबांना तीन गुंठे जमीन देण्यात येणार असून, सिडकोमार्फत घरे उभारण्यात येणार असल्याचे आमदार महेश बालदी यांनी सांगितले.
इर्शाळवाडी येथील दरडग्रस्त रहिवाशांना चौकजवळील मोरबे धरणानजीक सर्व्हे नंबर २७ येथे जागा देण्यात येणार असल्याचे महेश बालदी यांनी सांगितले. यामध्ये सुमारे पाच एकर जमिनीवर या रहिवाशांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार असून, प्रत्येक कुटुंबाला तीन गुंठे जागा देण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या महिनाभरात सिडकोमार्फत पुनर्वसनाचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे दरडग्रस्त कुटुंबीयांची तत्पुरत्या कंटेनर हाऊसमध्ये काही महिने व्यवस्था करण्यात येणार असून, पुढील वर्षीच्या पावसाळ्यापूर्वी कायमस्वरूपी घरे देण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार महेश बालदी यांनी सांगितले.