नवी दिल्ली : नेटफ्लिक्सची आगामी वेब सीरिज ” रिलीज होण्यापूर्वीच कर्जबुडवा उद्योगपती विजय मल्ल्या, सुब्रतो रॉय, हर्षद मेहता, निरव मोदी आणि हादरले आहेत. मेहुल चोकसीने दिल्ली हायकोर्टात याचिका करत वेब सीरिज रिलीज करण्यापूर्वी आम्हाला दाखवावी अशी मागणी केली आहे. हायकोर्टाकडून शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी केली जाणार आहे. वेब सीरिज रिलीजपूर्वी चोकसीला दाखवली जाणं शक्य आहे का, अशी विचारणाही कोर्टाने नेटफ्लिक्सला केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, वेब सीरिजच्या पहिल्या भागात चोकसीचा समावेश नाही. ही वेब सीरिज २ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. मेहुल चोकसीच्या वकिलाने कोर्टात सांगितलं की, २४ ऑगस्ट रोजी रिलीज झालेला ट्रेलर पाहिल्यानंतर चोकसी यांना जगभरातून फोन येणं सुरू झालं. दिल्लीतूनही त्यांना फोन करण्यात आले आणि तुम्ही या वेब सीरिजमध्ये दिसणार आहात का अशी प्रतिक्रिया विचारण्यात आली.

ट्रेलरमध्ये जी व्यक्ती बोलत आहे, ती पवन सी लाल असल्याचं उघड झाल्याचं याचिकाकर्त्याच्या लक्षात आलं. पवन सी लाल यांनी ‘Flawed: The Rise and Fall of India’s Diamond Mogul Nirav Modi’ हे पुस्तक लिहिलं आहे. याचिकाकर्त्याचं नाव यात वापरलेलं असून ते निरव मोदीसोबत जोडलं गेलं आहे, असं वकिलाने म्हटलं आहे.

चोकसी यांना चुकीच्या पद्धतीने विविध गुन्ह्यात ओढलं गेलं आहे. ते सध्या देशातील विविध यंत्रणांसमोर चौकशीला सामोरे जात आहेत, ज्याची सविस्तर माहिती याचिकेत देण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम २१ नुसार चोकसी यांनाही मुक्त आणि निष्पक्ष न्यायाचा अधिकार आहे. शिवाय याचिकाकर्त्यालाही सन्मानाने जगण्याचा हक्क आहे, असं याचिकेत म्हटलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here