रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मुंबई पाठोपाठ ठाणे व कल्याण-डोंबिवली महापालिकेवर सातत्यानं टीका होत असते. यंदाच्या पावसातही ठाणेकर व कल्याण-डोंबिवलीकर रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत तक्रारी करत आहेत. खड्ड्यांमुळं अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळं महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर टीका होत आहे. ही टीका होत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ठाणे दौरा ठरला. त्यानंतर ठाण्यातील महत्त्वाच्या मार्गांच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यावरून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेवर टीका करताना मुख्यमंत्री ठाकरे यांना खोचक टोला हाणला होता.
वाचा:
‘मुख्यमंत्री ठाण्यात येणार म्हणून त्यांच्या मार्गातील रस्ते खड्डेमुक्त केले. माझी विनंती आहे की त्यांनी डोंबिवलीतही सहज एक फेरफटका मारावा, किमान कल्याण-शीळ रोडवरचे खड्डे तरी भरले जातील. वाटल्यास मी स्वत: शीळफाट्यावर स्वागतासाठी उभा राहतो,’ असं उपरोधिक ट्वीट राजू पाटील यांनी केलं होतं. पाटील यांच्या ट्वीटची जोरदार चर्चा ठाण्यात रंगली होती.
शिवसेनेचे खासदार यांनी पत्रकारांशी बोलताना पाटील यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘ट्वीटरवर मागणी आणि फॉलोअप करणाऱ्या आमदारांनी प्रत्यक्षात कल्याण-शीळ रोडवर फेरफटका मारावा, म्हणजे या रस्त्यावर कुठे आणि कसं काम सुरू आहे हे त्यांना कळेल, असं श्रीकांत शिंदे म्हणाले. ‘लॉकडाऊनमुळं सध्या लोकल बंद आहे. त्यामुळं साहजिकच या रस्त्यावर वाहतुकीचा अतिरिक्त ताण आहे. असं असतानाही जमेल तसं खड्डे बुजवण्याचं व डांबरीकरणाचं काम सुरू आहे. हा रस्ता सहा पदरी करण्याचं कामही सुरू आहे. करोनाचा संकट असतानाही हे काम थांबलेलं नाही. त्यात पावसाचाही अडथळा आहे. पण खड्डे बुजवण्याचं काम लवकरात लवकर पूर्ण होईल, असंही शिंदे यांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times