शिरुर, पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एका शेतकरी महिलेने तहसीलदारांकडे एक अजब मागणी केली आहे. माझ्या शेतात जायला रस्ता नसल्याने मला शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर खरेदी करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यासाठी शासकीय अनुदान द्यावे, असे देखील संबंधित महिलेचे म्हणणे आहे. खुद्द तहसीलदारांनी शेतीची पाहणी करण्याचे आदेश देऊनही येथील मंडलाधिकाऱ्यांना वेळ नसल्याने महिलेने अशी मागणी केली आहे.

रिक्षाचालकाच्या लेकीची भरारी, जिद्दीने MBBS झाली, मात्र पदवी स्वीकारताना दुःखाने घेरलं
याबाबत अधिक माहिती अशी की, शिरूर तालुक्यातील निमोणे गावच्या महिला शेतकरी लताबाई भास्कर हिंगे यांना स्वतःच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने दि ५ डिसेंबर २०२२ रोजी १९६६ च्या कलम १४३ अन्वये शिरूर तहसिल कार्यालयात रस्ता मागणीचा अर्ज केला होता. त्या अर्जावर तत्कालीन तहसीलदार यांनी सुनावणी घेऊन संबंधित मंडळ अधिकारी यांना स्थळ पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र आदेश प्राप्त झाल्यापासून मंडळ अधिकाऱ्यांना लताबाई हिंगे यांनी भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र ते काही भेटले नाहीत.

शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर घेऊन द्या; शेतकऱ्याच्या पत्रातील मागणीमुळे तहसीलदार गोंधळात

अनेक हेलपाटे मारल्यानंतर मंडल अधिकाऱ्यांची आणि त्यांची भेट झाली. तेव्हा ते म्हणाले की, सध्या नवीन बदली होऊन इथे आलो आहे, मला सध्या वेळ नाही असे उत्तर त्यांनी त्या शेतकरी महिलेला दिले. त्यामुळे शेतकरी महिला संतप्त झाली.

बाळा, किमान मुख्यमंत्र्यांच्या लायकीचं काम सांग रे; दोन तास लाईट गेले, तरुणाचा शिंदेंना फोन
शेतामध्ये काढणीला आलेले पीक शेतात जाण्यासाठी रस्ता नाही, त्यामुळे माल मुख्य रस्त्यावर कसा घेऊन जायचा हा प्रश्न तिच्यासमोर होता. रस्ता नाही त्यामुळे आता हेलिकॉप्टर खरेदी केल्याशिवाय आता पर्याय नाही, त्यामुळे या शेतकरी महिलेने थेट तहसीलदारांकडे हेलिकॉप्टर खरेदीसाठी अर्ज केला असून त्यासाठी अनुदान मिळावे असे देखील त्यात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here