सांगली : पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार, नामचीन गुंड सचिन ऊर्फ सच्या टारझन याच्यावर आज सकाळी धारदार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आला. कुऱ्हाडीने केलेल्या हल्ल्यात सच्या हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. कुपवाडमधील अहिल्यानगर येथे ही घटना घडली. दरम्यान, संशयित हल्लेखोर गणेश मोरे याला कुपवाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, सच्या टारझन पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खुनाचे प्रयत्न यांसह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. नगरसेवक दाद्या सावंत याच्या खुनाच्या गुन्ह्यात तो सध्या जामिनावर बाहेर आला होता. सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास काही अज्ञात तरुण त्याच्या घरात घुसले. त्या तरुणांनी सच्यावर धारदार हत्याराने हल्ला चढवला.

आईला डिस्चार्च मिळाला, पोरगं घ्यायला गेलं, माय-लेकाची भेट होण्याआधीच नशिबाची विचित्र खेळी…

सच्या याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून काही मिनिटातच हल्लेखोर पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेत सच्या टारझन याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. सच्या टारझनवर खुनी हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सकाळी १० वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, कुपवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. सच्या टारझनवरील हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here