नाशिक : नाशिकमध्ये फेसबुक पोस्ट वरून थेट आजी-माजी आमदारांमध्येच जुंपली आहे. आमदार समर्थकांच्या कमेंटवरून हा वाद थेट पोलीस ठाण्यात गेला आहे. आमदार सरोज अहिरे समर्थकांनी ठाकरे गटाचे उपनेते माजी मंत्री बबनराव घोलप यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने घोलप समर्थकांनी त्यास कमेंटमध्ये उत्तर दिले होते. यावरून आमदार सरोज अहिरे यांनी थेट पोलिसांना फोन करून दोन युवकांना अटक करण्याची मागणी केली.

आमदार सरोज अहिरे यांनी थेट पोलिसांना फोन करून कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर पोलिसांनी कमेंट करणाऱ्या संबंधितांना ताब्यात घेतले. माजी आमदार बबनराव घोलप यांच्या समर्थकांना ताब्यात घेतल्याचे समजताच बबन घोलप यांचे पुत्र माजी आमदार योगेश घोलप आणि भाजप पदाधिकारी तनुजा घोलप यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत समर्थकांना ताब्यात घेतल्याचा जाब विचारला. या फेसबुक पोस्टमुळे आणि त्यावरील कमेंटमुळे आता राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे आणि ठाकरे गटाचे उपनेते बबन घोलप यांच्यात वाद निर्माण झाला आहे.

पुण्यावरुन मुंबईला येणारी वाहतूक दुपारी बंद होणार, मुंबई पुणे एक्सप्रेस वे बद्दल मोठी अपडेट
देवळालीच्या आमदार सरोज आहेरे यांची ही दबंगगिरी असल्याचे म्हणत सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप यावेळी घोलप समर्थकांकडून करण्यात आला आहे. तर घोलप समर्थकांच्या प्रतिक्रिया झोंबल्याने आमदार अहिरे यांनी कारवाईची मागणी केल्याची चर्चा सध्या देवळालीत सुरू आहे. राजकीय नेत्यांमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप चालूच असतात. अगदीच स्थानिक पातळीवर देखील याचा प्रत्यय येत असतो. परंतु आता देवळाली मतदारसंघात आजी-माजी आमदारांच्या समर्थकांमध्ये सोशल मीडिया वॉर चालू असल्याचे पाहायला मिळत आहे.

गोगावलेंना १५० कोटींचा निधी, दादांचा खरपूस समाचार घेत राऊत म्हणाले-मला धक्का बसलाय
आजी माझी आमदारांच्या समर्थकांनी फेसबुकवर केलेली पोस्ट आणि त्यावरील कमेंटवरून आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली आहे. फेसबुक पोस्ट आणि कमेंटचा वाद जरी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला असला तरी त्यामुळे येत्या काळात देवळाली मतदारसंघातील राजकारण काय नवीन वळण घेते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मानसकन्येने शरद पवारांची साथ सोडली, उद्धव ठाकरेंचा एक्का भिडणार, २०१९ चा बदला घेणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here