मुंबई- संजय दत्तला कर्करोग झाल्याचं निदान काही दिवसांपूर्वी आलं होतं. यानंतर त्याने मुंबईतच प्राथमिक उपचारांना सुरुवात केली. ताज्या अहवालानुसार तो अमेरिकेत उपचार घेण्यासाठी जाण्याची तयारी करत आहे. रिपोर्ट्सनुसार संजय दत्तला फुफ्फुसांचा कर्करोग आहे.

व्हिसा मिळणं होतं कठीण

एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, कर्करोग झाल्याचं निदान होताच संजयने अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज केला होता. १९९३ स्फोटातील दोषींपैकी एक असल्यामुळे सुरुवातीला त्याला व्हिसा मिळण्यात अनेक अडचणी येत होत्या.

वैद्यकीय कारणास्तव मिळाला व्हिसा
रिपोर्ट्सनुसार त्याच्या जवळच्या मित्राने त्याला वैद्यकीय गरज दाखवून ५ वर्षांसाठीचा व्हिसा मिळवून दिला आहे. आता कर्करोगावर उपचार घेण्यासाठी तो पत्नी मान्यता आणि बहीण प्रियासोबत न्यूयॉर्कला जाणार असल्याचं बोललं जात आहे.

आई नर्गिसवरही या रुग्णालयात करण्यात आले होते उपचार
संजय दत्तची आई नरगिस यांनाही १९८० आणि १९८१ मध्ये कर्करोग झाला होता. त्यांनाही याच इस्पितळात दाखल करण्यात आले होते. एवढंच नाही तर ऋषी कपूर, मनीषा कोईराला आणि सोनाली बेंद्रे यांनीही याच इस्पितळातून उपचार घेतले होते. संजयला अमेरिकेत जाण्याची परवानगी मिळाली नसती तर तो सिंगापूरला पुढील उपचारांसाठी जाण्याचीही तयारी करत होता असं सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here