मुंबई : काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नीट आणि जेईई या परीक्षांच्या मुद्द्यावर सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली, ज्यात मुख्यमंत्री यांचाही समावेश होता. करोना परिस्थितीला महाराष्ट्र ज्या पद्धतीने तोंड देत आहे, त्याचं कौतुक पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही केलं.

उद्धव ठाकरे यांना कॅबिनेटची बैठक होती. त्यामुळे त्यांना अगोदर बोलू द्यावं, अशी विनंती सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना केली. बोलण्याच्या सुरुवातीलाच इजाजत है क्या दीदी, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बोलण्यासाठी सुरुवात केली. यावेळी ममता दीदी म्हणाल्या, ‘आप बहुत अच्छा फाईट कर रहे है’. उद्धव ठाकरेंनीही ‘लडने वाले बाप का लडने वाला बेटा हूँ’ असं उत्तर दिलं.

सात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जेईई आणि नीट या परीक्षांच्या मुद्द्यावर आपलं मत मांडलं. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेलही उपस्थित होते. येत्या गुरुवारी २७ ऑगस्ट रोजी ‘जीएसटी कौन्सिल’ची बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यांची थकबाकी मिळावी म्हणून जीएसटी परिषदेवर आणि पर्यायाने केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठीच काँग्रेसने ही बैठक बोलावल्याचं बोललं जात आहे. तसेच देशात सक्षम विरोधी पर्याय उभा करण्यासाठीही सोनिया गांधी यांनी मित्र पक्षांना विश्वासात घेण्यास सुरुवात केल्याचंही बोललं जात आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळून परीक्षा घेणं हा निर्णय चुकीचा असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. मागे अमेरिकेत शाळा उघडल्या आणि ९७ हजार विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. आपल्याकडे शाळा सुरू केल्यानंतर तसा प्रकार घडला तर जबाबदार कोण, असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत जानेवारी ते डिसेंबर हे शैक्षणिक वर्ष करण्याबाबतचाही मुद्दा मांडला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here