मॉस्को: रशिया आपली संरक्षण सज्जता आणखीच वाढवत आहे. रशियन लष्कराच्या ताफ्यात पुढील वर्षी २०२१ मध्ये सर्वात नवीन अत्याधुनिक शस्त्रे दाखल होणार आहे. ब्रम्हास्त्र म्हणून ओळखले जाणारे मिसाइल डिफेन्स सिस्टम एस-५०० ची चाचणी सुरू करण्यात येणार आहे. येत्या चार-पाच वर्षात पूर्ण क्षमतेन एस-५०० लष्कराच्या ताफ्यात दाखल होणार आहे.

एस-५०० या नव्या प्रणालीची निर्मिती अलमाज अॅण्टी एअर डिफेंस कर्सनने केली आहे. रशियाचे उपपंतप्रधान युरीय बोरिसोव यांनी सांगितले की, जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या या प्रणालीची चाचणी सुरू करण्यात आली आहे. ही प्रणाली रशियाची सुरक्षा कवच असून हायपरसोनिक क्षेपणास्त्रे ते ड्रोन विमानांचा क्षणातच खात्मा करू शकते. ४०० ते ६०० किलोमीटर मारा क्षमता असणारी ही सुरक्षा प्रणाली जमिनीपासून शेकडो किमी अंतरावरील लक्ष्याचा वेध घेण्यास सक्षम आहे.

वाचा:

मिसाइल डिफेन्स सिस्टीम आवाजाच्या वेगापेक्षा अधिक वेगवान आहे. १६ हजार मैल प्रतितास वेगाने क्षेपणास्त्रे लक्ष्याचा वेध घेण्यास सक्षम आहे. एस-५०० च्या पहिल्या पिढीतील स्पेस डिफेन्स नेटवर्कसारखे असे शस्त्र जगात कुठेच नसल्याचा दावा करण्यात येत आहे. एकाच वेळी १० लक्ष्यांचा वेध घेण्याची क्षमता आहे. एस-५०० हे अंतराळातील एका विशिष्ट अंतरावरील उपग्रहांचा वेध घेऊ शकतो.

वाचा:

एस-५०० चे मुख्य काम हे आपल्याजवळ येणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या आणि आंतरखंडीय क्षेपणास्त्रांना उद्धवस्त करणे आहे. युनानी देवता प्रोमिथीयस यांच्या नावावरून एस-५०० प्रोमिथियस असे नाव देण्यात आले आहे. एस-५०० डिफेंस सिस्टीम 55R6M Triumfator-M या नावानेही ओळखले जाते. काही वर्ष आधीच याचे उत्पादन सुरू होणार होते. मात्र, आता २०२१मध्ये याचे उत्पादन सुरू होणार असल्याचे म्हटले जात आहे.

वाचा:

सध्या रशियाकडे एस-४०० ही मिसाइल डिफेन्स सिस्टीम आहे. भारतालादेखील ही यंत्रणा देण्यात येणार आहे. त्याशिवाय रशियाने ही प्रणाली इतरही काही देशांना दिली आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये भारत आणि रशियाने पाच एस-४०० मिसाइल सिस्टमसाठी ५.४३ बिलियन म्हणजेच जवळपास ४० हजार कोटी रुपयांचा करार केला होता. जगभरात एस ४०० या क्षेपणास्त्राचा मोठा बोलबाला आहे. कारण हवाई संरक्षणातील ते अतिशय शक्तीशाली क्षेपणास्त्र म्हणून ओळखलं जातं. शत्रूचा कुठल्याही प्रकारचा हवाई हल्ला नेस्तनाबूत करण्याची क्षमता यात आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here