‘इस प्यार को क्या नाम दूं’, ‘थपकी प्यार की’ आणि ‘भंवर’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये संगीता यांनी काम केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार त्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या आणि त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संगीता श्रीवास्तव यांना वेस्कुलिटिस (vasculitis) नावाच्या आजाराने ग्रासले होते.
वर्ष २०२० हे मनोरंजन क्षेत्रासाठी फारसं चांगलं राहिलेलं नाही. आतापर्यंत अनेक हरहुन्नरी कलाकार सोडून गेले. काहींचा प्रदीर्घ आजाराने मृत्यू झाला तर काहींनी आत्महत्या केली अशात सिनेवर्तुळात एक दुःखाची लाट पसरलेली आहे. काही दिवसांपूर्वी ‘इस प्यार को क्या नाम दूं? एक बार फिर’ फेम समीर शर्माने मालाडमधील त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला. पण त्याने आत्महत्या केल्याचं पोलीस अहवालात म्हटलं आहे. परंतू, अद्याप त्याच्या मृत्यूबद्दलचं गुढ उकललं नाही.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times