धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. कारण धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ साली ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर २०११ साली एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक आणि चॅम्पियन्स करंडकालाही गवसणी घातली होती. त्याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्येही भारतीय संघ अव्वल स्थानावर होता. कोहली हा सध्याचा आक्रमक कर्णधार आहे, असे म्हटले जाते. पण कोहलीला एकही मोठी स्पर्धा जिंकता आलेली नाही. पण कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने बऱ्याच मालिका जिंकलेल्या आहेत.
धोनी आणि कोहली यांच्या नेतृत्वामध्ये नेमका काय फरक आहे, हे भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने सांगितले आहे. आगरकर म्हणाला की, ” धोनी आणि कोहली यांच्या नेतृत्वामध्ये फार तफावत जाणवते. कारण धोनी हा जास्तकरून फिरकी गोलंदाजांवर अवलंबून असायचा, त्याचबरोबर मध्यमगती गोलंदाजांनावरही त्याची काही प्रमाणात भिस्त होती. या दोन्ही घटकांकडून कशी कामगिरी करून घ्यायची, हे धोनीला चांगले उमगलेले होते. पण कोहलीची गोष्ट त्याविरुद्ध होती. कारण कोहलीची भिस्त ही वेगवान गोलंदाजांवर जास्त असल्याचे पाहायला मिळाले. कोहली हा वेगवान गोलंदाजांना जास्त संधी देतो आणि त्यांच्यावर अवलंबून असतो.”
आगरकर पुढे म्हणाला की, ” जेव्हा तुम्ही मायदेशात खेळत असता तेव्हा परिस्थिती वेगळी असते आणि जेव्हा तुम्ही परदेशात खेळत असता तेव्हा तुमच्या कामगिरीत फरक पडत असतो. धोनी आणि कोहली यांचे क्रिकेटबाबतचे विचार वेगळे आहेत. त्यामुळे ही गोष्ट त्यांच्या नेतृत्ववामध्येही पाहायला मिळते. दोघांनीही बराच काळ भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे आणि दोघांनाही यश मिळाले आहे. पण दोघांचीही नेतृत्व करण्याची शैली ही नक्कीच वेगळी आहे. कारण दोघांचीही खेळाडूंना हाताळण्याची पद्धत फारच वेगळी आहे. त्यामुळे धोनी आणि कोहली यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला फरक जाणवतो.”
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times