मुंबई : भारतीय शेअर बाजारात सर्वसामान्यांसाठी गुंतवणूक करणे सोपे होईल यासाठी भांडवली बाजार नियामक सेबी नियमित बदल करण्याचा प्रयत्न करत असते. यावर्षी जानेवारी २०२३ रोजी सेबीने सुरक्षित गुंतवणुकीसाठी जवळपास १९ वर्षांनी T+1 सेटलमेंट नियम लागू केला होता आणि आता सेबी त्याहूनही पुढचा विचार करत आहेत. अशा स्थितीत सेबीकडून नवीन नियम लागू झाल्यास तुम्ही स्टॉक विकल्यास तुम्हाला एक दिवसही वाट पाहावी लागणार नाही आणि लवकरच तुमच्या बँक खात्यात त्वरित पैसे ट्रान्सफर होईल. त्याचप्रमाणे, तुम्ही शेअर खरेदी केल्यास त्याच दिवशी तो तुमच्या डिमॅट खात्यात दिसून येईल.

तेजीच्या शेअर बाजारात नुकसान नको; निर्देशांक वाढत असताना पैसे कसे बनवाल, एका क्लिकवर
शेअर बाजारात येणार नवीन नियम
बाजार नियामक सेबी शेअर बाजारात ट्रेडिंगच्या त्वरित सेटलमेंटसाठी T+0 यंत्रणेवर काम करत आहे, ही प्रक्रिया व्यापाराच्या दिवसानंतर T+1 सेटलमेंटच्या सध्याच्या प्रणालीपेक्षा वेगवान असेल, असे सेबी अध्यक्षा माधबी पुरीबुच यांनी सोमवारी सांगितले. “भारत ही पहिली मोठी अर्थव्यवस्था आहे जिने T+1 सेटलमेंट प्रणाली आणली,” सेबी प्रमुख म्हणाले असून या निर्णयामुळे गुंतवणूकदारांसाठी सुमारे १० हजार कोटी रुपये अतिरिक्त पैसे (मार्जिन) प्रणालीमधून मुक्त होण्यास मदत झाली, त्यांने पुढे म्हटले.

अनिल अंबानींच्या शेअरने केलं कंगाल, २५०० रुपयांवरून १५५ वर उतरला भाव; एक्स्पर्ट म्हणाले खरेदी करा!
जागतिक बाजारात T+2 सेटलमेंट प्रणाली
जागतिक स्तरावर बहुतेक विकसित बाजारपेठा T+2 प्रणालीवर काम करत आहेत तर भारत हा T+1 प्रणालीतील एक नेता आहे जी या वर्षाच्या जानेवारीच्या अखेरीस पूर्णपणे लागू झाली. बाजारातील विश्लेषकांच्या मते भारतातील डिपॉझिटरीजद्वारे उच्च विकसित पेमेंट यंत्रणा आणि विकसित स्टॉक ट्रान्सफर प्रक्रिया त्वरित सेटलमेंट सुलभ होईल.

शेअर बाजारातलं ‘अनमोल रत्न’; राकेश झुनझुनवालांचं नशीब पालटलं, आजही करुन देतोय बक्कळ कमाई
दरम्यान, सेबीने असेही म्हटले की रिव्हर्स बुक-बिल्डिंग यंत्रणेच्या सध्याच्या प्रणालीऐवजी ते निश्चित किंमतीवर स्टॉकच्या डीलिस्टिंगला परवानगी देऊ शकतात. सध्याच्या यंत्रणेनुसार डिलिस्टिंग ऑफर दरम्यान शेअरधारकांना त्यांचे शेअर्स सोडण्यास इच्छुक असलेल्या किमतीवर बोली लावण्याची परवानगी आहे. दरम्यान, सेबी यावर एक चर्चापत्र जारी करेल आणि त्यावर भागधारकांकडून प्रतिक्रिया मागवेल, असे सेबी अध्यक्षांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here