मुंबई : वाढत्या महागाईत आता टोमॅटोने सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढवली आहे. अशात टोमॅटोच्या किरकोळ किमतीत वीकेंडला किलोमागे २०० रूपयांची विक्रमी वाढ झाली आहे. इतकंच नाहीतर, खरेदीदारांची संख्या सार्वकालिक नीचांकी झाली आहे, ग्राहकांच्या कमतरतेमुळे काही भागात टोमॅटोचे स्टॉल बंद करण्यात आल्याचीही माहिती आहे.

अधिक माहितीनुसार, पिकांची कमतरता आणि पावसामुळे होणारी नासाडी यामुळे जूनपासून जीवनावश्यक घटक असलेल्या टोमॅटोचे दर सातत्याने वाढत आहेत, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मे महिन्यात नियमित ३० रुपये किलो दराने विकला जाणारा टोमॅटो १३ जूनला दुप्पट होऊन ५०-६० रुपये झाला, त्यानंतर २७ जूनला १०० रुपयांचा टप्पा पार केला आणि ३ जुलैला १६० रूपयांचा नवा विक्रम केला. भाजीपाला विक्रेत्यांनी भाजीपाला २०० रूपयांचा अडसर मोडून काढेल असा अंदाज वर्तवला होता.

Maharashtra Weather Alert : राज्यात पुढच्या ३-४ तासांत तुफान पाऊस, मुंबईसह ४ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा
एपीएमसी वाशीचे संचालक शंकर पिंगळे म्हणाले की, ‘घाऊक दर ८० ते १०० रुपये प्रति किलो होता. सोमवारी, लोणावळ्यातील भूस्खलनामुळे वाशी मार्केटला होणारा सर्व पुरवठा विस्कळीत झाला होता आणि ट्रॅफिक जाम आणि वळणामुळे ट्रक अडले होते. यामुळे आवक कमी झाली, ज्यामुळे दरात तात्पुरती वाढ झाली. काही दिवसांत पुरवठा पुन्हा सुरू होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे.’ अशात, आठवड्याच्या शेवटी किमतीत वाढ झाली नाही.

तुम्हाला सरणालाही टोमॅटो देतो, लाकडं वापरूच नका; सदाभाऊ खोतांचा तोल ढासळला

वाशीतील दुसरे व्यापारी सचिन शितोळे यांनी ११० ते १२० रुपये भाव असल्याचे सांगितले. दादर मार्केटमध्ये हरित विक्रेते रोहित केसरवाणी म्हणाले की, “इथं घाऊक दर १६० ते १८० रुपये आहेत आणि वाशी मार्केटमध्ये आज चांगला टोमॅटो मिळत नव्हता.” खार मार्केट, पाली मार्केट वांद्रे, दादर मार्केट, माटुंगा, चार बंगले अंधेरी, मालाड, परळ, घाटकोपर आणि भायखळा येथील विक्रेत्यांनी२०० रुपये तर काहींनी १८० रूपयांचा सवलतीचा दर देऊ केला.

रविवारी चार बंगला आणि अंधेरी स्टेशन परिसरातील टोमॅटोचे स्टॉल बंद करण्याची वेळ आली. एका विक्रेत्याने सांगितले की, “महिन्याभरापासून जवळपास कोणीही खरेदीदार नाहीत. १००-१४० रुपये किलोने महागडे टोमॅटो मी किती काळ विकत घेऊ शकेन आणि पावसात खराब होताना बघू शकेन? “

सावधान! दरवाढीमुळे टोमॅटो चोरांचा सुळसुळाट, एपीएमसी मार्केटमधील घटनेनं खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here