नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे जगभरातील सर्व देशांच्या आर्थिक विकास दराला मोठा दणका बसला आहे. अमेरिका, ब्रिटन यांच्या अर्थव्यवस्थेत आजवरची विक्रमी घसरण झाली आहे. भारतीय अर्थव्यवस्था देखील याला अपवाद नाही. गेल्या काही महिन्यांपासून अर्थव्यवस्थेबद्दल सातत्याने निराश बातमी येत आहेत. अशातच सर्वांना दिलासा देणार एक चांगली बातमी आली आहे.

वाचा-
रेटिंग एजन्सी मूडीजने मंगळवारी म्हटले की, या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येईल. जी-२० मध्ये फक्त भारत, चीन आणि इंडोनेशिया या देशांच्या अर्थव्यवस्था रुळावर येण्याची शक्यता आहे. या तिनही देशांच्या अर्थव्यवस्था २०२०च्या दुसऱ्या तिमाहीत वेग पकडतील.

मूडीजने भलेही दुसऱ्या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येईल असे म्हटले असेल तरी संपूर्ण आर्थिक वर्षात देशाचा विकास दरात ३.१ टक्के इतकी घसरण होईल असे देखील म्हटले आहे.

वाचा-
विकसीत देशांपेक्षा विकसनशील देश लवकर करोना संकटातून बाहेर पडतील. चीन, भारत आणि इंडोनेशिया हे जी-२० मधील असे देश असतील जे २०२०च्या दुसऱ्या तिमाहीत वेग पकडतील आणि २०२१मध्ये बाबत करोनाआधीची स्थिती गाठतील.

मूडीजने २०२१ मध्ये देशाचा विकास दर ६.९ टक्के इतका असेल असे म्हटले आहे. अर्थात करोना आधी भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती फार चांगली नव्हती. २०१९-२० या काळात विकास दर फक्त ४.२ टक्के इतका होता. जो गेल्या ११ वर्षातील सर्वात कमी होता.

वाचा-

RBI काय म्हणते
याआधी भारतीय रिझर्व्ह बँकेने २०२०-२१ मध्ये देशाचा विकास दर हा नकारात्मक असेल असे म्हटले होते. बँकेने पतधोरण जाहीर करताना विकास दराबाबतचा अंदाज व्यक्त केला होता. तर इन्फोसिसचे सहसंस्थापक एन आर नारायणमूर्ती यांनी करोनामुळे देशाच्या विकास दरात स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठी घसरण असेल, असे म्हटले होते.

वाचा-
अन्य काही रेटिंग एजन्सींनी देशाच्या विकास दराबाबत भिती दायक अंदाज व्यक्त केले होते. काहींच्या मते अर्थव्यवस्थेत ३ ते ९ टक्के इतकी घसरण होऊ शकते. फिंच रेटिंग्सने पाच टक्के घसरण होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here