दौंड: दौंड तालुक्यातील राहू येथे एका परप्रांतीयाची हत्या केल्याची तर गलांडवाडी येथे एकाने ग्राइंडरने स्वतःचा गळा कापून जीवन संपवल्याची घटना घडली आहे. या दोन वेगवेगळ्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिमकुमार अनिल यादव (वय ३० वर्षे रा. जयपुर तहसिल मेंहदीया जि.अरवल राज्य बिहार) असे हत्या झालेल्या परप्रांतीयाचे नाव आहे. तर विपुल रमेश गदरे (रा. तालुका कर्जण जिल्हा बडोदा गुजरात) असे जीवन संपवलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

यवत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दौंड तालुक्यातील गलांडवाडी येथे तुळशीराम शेलार यांच्या घराशेजारी असलेल्या एका खोलीत खडबड खडबड आवाज आल्याने शेलार तेथे कसला आवाज येत आहे हे पाहण्यासाठी गेले. असता त्यांना विपुल गदरे यांनी ग्राइंडरच्या सहाय्याने गळा कापून जीवन संपवल्याचं निदर्शनास आले. याबाबत शेलार यांनी यवत पोलिस ठाण्यात खबर दिली.

चुकूनही विकेंडला लोणावळा जाऊ नका, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील VIDEO पोस्ट करत व्यक्तीने दिला सल्ला
तसेच, दौंड तालुक्यातील राहू येथे भीमकुमार यादव या परप्रांतीय व्यक्तीची कोणी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून धारदार शस्त्राने खून करून त्याचा मृतदेह येथील महादेव तुकाराम शिंगारे रा. राहु ता. दौंड जि. पुणे यांच्या मालकीच्या विहिरीत फेकून दिल्याची घटना घडली. भीमकुमार हा रामराव शहाजी सोनवणे यांच्या सोनवणे डेअरी फार्म या म्हशीच्या गोठ्यावर कामाला होता.

तरुणीवरील हल्ल्याने पुणे सुन्न! बचावास गेलेले अनेक जण जखमी; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

मात्र, सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास भीमकुमार यांचा मृतदेह महादेव तुकाराम शिंगारे यांच्या विहिरीच्या पाण्यात तरंगताना काही कामगारांना आढळून आला. कामगारांनी या घटनेची तत्काळ माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच दौंडचे पोलिस उपविभागीय अधिकारी स्वप्नील जाधव, पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, पोलीस उपनिरीक्षक संतोष कदम आणि पोलिस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस आणि नागरिकांनी भीमकुमार यांचा मृतदेह बाहेर काढला. याबाबत पोलिस पाटील सुरेश सोनवणे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सोनवणे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Gold Scheme: प्लास्टिक द्या अन् सोनं घेऊन जा… या गावची अजब स्कीम, पत्ता लिहून घ्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here