छत्रपती संभाजीनगर: शहरातील वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी येथे शेतीच्या वादातून दोन कुटुंबामध्ये तुफान हाणामारी पहायला मिळाली. या मारामारीत यामध्ये एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबावर तलवारीने वार केले. अंगावर शहारे आणणारा हा संपूर्ण प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काही जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी येथे गट नंबर ५९ मध्ये शेत जमिनीवरून वाद झाला. शाब्दिक चकमक सुरू असताना एक तरुण थेट तलवार घेऊन आला. दरम्यान शिवीगाळ सुरू असताना एका तरुणाने दुसऱ्या कुटुंबातील सदस्यांवर थेट तलवारीने हल्ला करायला सुरुवात केली. सपासप चार-पाच जणांवर तलवारीने वार केला. यामध्ये तीन ते चार जण गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यामध्ये एकनाथ साळे तसे त्यांचे बंधू उद्धव साळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील उपचारसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यामध्ये परस्परांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यातील काही आरोपींना वाळूज पोलिसांनी अटक केली असून काही आरोपींना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. अंगावर शहारे आणणारा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे.