मुंबई: राज्यातील धार्मिकस्थळे आणि मंदिरं सुरू करण्यासाठी राज्यभरातील धार्मिक संघटना एकवटल्या आहेत. या धार्मिक संघटनांनी २९ ऑगस्ट रोजी राज्यभर घंटनाद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून भाजही या आंदोलनात सहभागी होणार असल्याने मंदिरे सुरू करण्यासाठीचा ठाकरे सरकारवरील दबाब वाढला आहे.

मंदिरं सुरू करा, या मागणीसाठी महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन होणार आहे. आध्यात्मिक समन्वय आघाडीने या आंदोलनाची हाक दिली आहे. भारतीय जनता पार्टीचा या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा असून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे. तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होताना फेस मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे इत्यादी कोरोनासाठीच्या सर्व नियमांचे पालन करावे, अशी सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केली आहे.

केंद्र शासनाने देवस्थाने सुरू करण्याबाबत यापूर्वीच परिपत्रक जारी केले आहे व देशभरातील प्रमुख देवस्थाने सुरू देखील करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही देवस्थाने सुरू करण्याची अनेक व्यक्ती तसेच संघटनांनी राज्य सरकारकडे खूप वेळा मागणी केली. सर्व नियम मान्य करुन देवस्थाने आणि भजन, पूजन, कीर्तन सुरु करावे ही सर्वांची एकमुखाने मागणी असतानाही, राज्यातील महाविकास आघाडी सरकार ती मान्य करत नाही. “ठाकरे सरकार”ला इशारा देण्याकरिता व देवस्थाने सुरु करा या मागणीसाठी राज्यभर “दार उघड उद्धवा दार उघड” अशी हाक देत “घंटानाद आंदोलन” विविध धार्मिक संस्था व संघटनांतर्फे होणार आहे. या आंदोलनाला भाजपा पूर्ण पाठिंबा देत आहे. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होतील, असं सांगतानाच तीर्थक्षेत्र आणि प्रमुख देवस्थांनांच्या परिसरातील असंख्य लोकांची उपजीविका केवळ देवस्थानांवर अवलंबून आहे. त्याचाही राज्य सरकारने सहानुभूतीने विचार करण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, काल राज्यातील धार्मिकस्थळे सुरू करावीत या मागणीसाठी आज राज्यातील विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या समित्यांच्या प्रमुखांची एक बैठक पार पडली. आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या पुढाकाराने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक पार पडली. यावेळी येत्या शनिवारी २९ ऑगस्ट रोजी राज्यभर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. ‘दार उघड उद्धवा, दार उघड’, अशी आरोळी देत हे आंदोलन करण्यात येणार असल्याचंही या आघाडीने स्पष्ट केलं. या बैठकीला शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, माजी अध्यक्ष अतुल भोसले, श्रीसिद्धिविनायक मंदिर समितीचे विश्वस्त सुमंत घैसास यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here