देशात पुण्यासह करोनाच्या रुग्णाबरोबर त्यामुळे होणाऱ्या मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आजाराला प्रतिबंध करणारी लस कधी उत्पादित होणार इथपासून ते ती बाजारात कधी उपलब्ध होणार याच्या चर्चा देश पातळीवर सुरू झाल्या आहेत. नुकतीच केंद्र सरकारने पुण्याच्या आघाडीच्या सिरम इन्स्टिट्यूटला मानवी चाचण्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीला मान्यता दिली. त्यानुसार पुण्यातील भारती रुग्णालयात मानवी चाचणीला बुधवारपासून प्रारंभ झाला.विशेष म्हणजे पुण्यातील उत्पादकांच्या लसीच्या चाचणी पुण्यात पुणेकर स्वयंसेवकावर होत आहे.
”कोव्हीशील्ड’ लशीच्या भारतातील चाचण्यांची सुरुवात बुधवारी भारती रुग्णालयात दिलेल्या लशीपासून झाली आहे. रुग्णालयात सुमारे ३५० स्वयंसेवकांना लस देण्यात येणार असून हे सर्व स्वयंसेवक १८ वर्षांवरील निरोगी महिला आणि पुरुष आहेत. सर्व स्वयंसेवकांची तसेच प्रतिपिंड चाचणी करुन त्यानंतर त्यांना लस देण्यात येणार आहे,’ अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय ललवाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times