मुंबई: राज्यात काल करोनामुळे ३२९ रुग्णांना प्राण गमवावा लागलेला असतानाच आजही २९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसात राज्यात करोनामुळे ६२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यातील करोनामुळे दगावलेल्यांची एकूण संख्या २३ हजार ८९ इतकी झाली आहे. राज्यातील बळींचा आकडा दररोज सरासरी दोनशेच्यावर असल्याने आरोग्य यंत्रणेचीही डोकेदुखी वाढली आहे.

आज राज्यात १४ हजार ८८८ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ७ लाख १८ हजार ७११ वर गेली आहे. तर आज एकूण ७ हजार ६३७ रुग्ण बरे झाल्याने राज्यातील करोनामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५ लाख २२ हजार ४२७ इतकी झाली आहे. तर राज्यात सध्या १ लाख ७२ हजार ८७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here