‘ड्रग्सचा कट’ पाहता NCBने सुशांतच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 20, 22, 27, 28, 29 नारकोटिक ड्रग्स अॅण्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्री रियासह तिच्या साथीदारांविरोधात हा गुन्हा दाखल केला गेला आहे. रिया विरोधात गुन्हेगारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांचा रेकॉर्ड तपासणार
ईडीच्या एफआयआरमध्ये ज्यांची ज्यांची नावं होती त्यांच्याविरूद्ध एनसीबीने गुन्हा दाखल केला आहे. यात रियाच्या भावासह इतरांचाही समावेश आहे. या प्रकरणी आता , तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, जया साहा, श्रुती मोदी आणि पुण्याचा गौरव आर्य आणि इतर ड्रग्स डिर्लसचे रेकॉर्ड तपासले जाणार आहेत. दिल्लीतील NCB चे ऑपरेशन्स युनिट हे मुबंतील मुंबईतील एनसीबीसोबत मिळून सुशांत प्रकरणात ड्रग्स अँगलची चौकशी करणार आहे.
रियाच्या भावाचे ड्रग्स तस्करांशी कनेक्शन?
रियाचा भाऊ शौविक आणि इतर काही जणांचे ड्रग्स तस्करांशी संबंध आहेत. यामुळे सुशांतला एखाद्या सुनियोजित षडयंत्रांतर्गत ड्रग्सच्या सापळ्यात अडकवण्यात आलंय का? याचा तपास एनसीबी करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
ड्रग्स चॅट्समधून मोठा खुलासा
रिया चक्रवर्ती आणि इतर संबंधित जणांचे सातत्याने होत असलेले ड्रग्स चॅट्स उघड झाल्यानंतर ही कारवाई होत आहे. रिया weed साठी १७ हजार रुपये देण्यास तयार होती. एवढचं नव्हे तर चहा, कॉफी किंवा पाण्यात ४ थेंब टाकून त्याला दे. त्याचा परिणाम बघण्यासाठी ३० ते ३० मिनिटं थांब, असा मेसेज जया साहाने रियाला केला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times