याबाबत अधिक माहिती अशी की, कामाच्या शोधात पुण्यात आलेल्या मणिपूर येथील एका १६ वर्षीय मुलीचा पुण्यातल्या कोंढवा परिसरात विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे मात्र, या घटनेने समजात संतापाची लाट पसरली आहे.
सोळा वर्षाच्या पीडितेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अलताफ नाझीर खान (वय २१, रा. मालविल मशीद शेजारी, कोंढवा खुर्द) याला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना २३ जुलै रोजी रात्री ११ वाजून १५ मिनिटांनी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पीडित मणिपुरी मुलगी ही एका महिन्यापूर्वीच कामाच्या शोधात पुण्यात आली होती. ती आपल्या ३ बहिणींसोबत राहत होती. घटनेच्या दिवशी पीडित मुलगी पायऱ्यांवरून खाली उतरत होती. त्यावेळी मागून आलेल्या अलताफ नाझीर खान याने तिला धक्का मारून खाली पाडले आणि तिच्याशी अश्लील चाळे करू लागला. यावेळी पीडित तरुणी जोर जोरात ओरडू लागली. तिचा आवाज एकूण तिच्या बहिणी खाली धावत आल्या. तिच्या बहिणी खाली येत असल्याचे पाहून आरोपी अलताफ नाझीर खान पळून गेला होता. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर करत आहेत.