सांगली: जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांनी आता पुन्हा कर्नाटक मध्ये जाण्याचा इशारा दिला आहे. यासाठी थेट आंदोलन देखील सुरू केले आहे. काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली जवळपास ५० हून अधिक गावांनी संख येथे चक्री उपोषण सुरू केले असून आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून जत तालुक्याची ओळख आहे.
राधानगरी धरण भरलं, पंचगंगा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल, सतेज पाटील यांचं सिद्धारामय्यांना पत्र, म्हणाले..
यंदा जुलै महिना संपत आला तरी पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे यावर्षी तालुक्याला भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यापासून जनावरांच्या चाऱ्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या जवळपास १००% वाया गेल्या आहेत. तर पाण्याच्या टँकरची मागणी आता गावागावातून वाढू लागली आहे. मात्र प्रशासनाकडून आणि राज्य सरकारकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत होता जत तालुक्यातील ६५ गावांनी दुष्काळी तालुक्याच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडले आहे.

ही तर ठाकरी भाषा; उद्धव ठाकरेंकडून शिंदे गटाचा सुकलेली पानं असा उल्लेख, राजन साळवींची प्रतिक्रिया

जत तालुक्यातील संख येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्तांनी चक्री उपोषण सुरू केले आहे. राज्य सरकारकडून जर पाणी देता येत नसेल आणि दुष्काळ जाहीर करता येत नसेल तर आता आम्हाला कर्नाटकमध्ये जाण्यासाठी परवानगी द्यावी, अशी पुन्हा एकदा दुष्काळग्रस्तांनी मागणी केली आहे. कर्नाटक सरकारकडून तुबची बबलेश्वरच्या माध्यमातून जतच्या दुष्काळी ६५ गावांना पाणी तातडीने मिळू शकतं. मात्र या बाबतीत राज्य सरकार चाल-ढकल करत आहे. याशिवाय विस्तारित म्हैशाळ योजनेला निधी मंजूर करून केवळ गाजर दाखवण्याचा उद्योग करण्यात आल्याचा आरोप देखील दुष्काळग्रस्तांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here