छत्रपती संभाजीनगर: काकाच्या घरी आलेल्या अठरा वर्षीय मुलाचा साप चावून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. साहित्य घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला साप चावला. दरम्यान त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली. ही घटना मंगळवार दि. २५ जुलै रोजी अकरा वाजता घडली. घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Crime Diary : कारमध्ये मृतदेह, AC चालूच अन् कोब्राचं विष; वाचा बॉयफ्रेंड बदलणाऱ्या ‘विषारी गर्लफ्रेंड’ची कहाणी
मिळालेल्या माहितीनुसार, दत्ता संजय तुपे (१८) रा. आडगाव खुर्द तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद, असे सर्पदंश झाल्यानंतर मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. दत्ता हा मूळचा आडगाव खुर्द येथील आहे. दत्ताची आई-वडील शेती करतात. त्याला एक भाऊ होता. मात्र त्या भावाने काही दिवसांपूर्वी जीवन संपवलं होतं. यामुळे दत्ता हा त्याच्या आई-वडिलांना एकुलता एक आधार होता. दत्ता नुकताच बारावी उत्तीर्ण झाला. काही दिवसांपूर्वी हर्सूल परिसरात राहणाऱ्या काकाकडे तो आला होता. या ठिकाणी त्याची अकॅडमी सुरू होती.

भयानक! विषारी घोणस सापाला भक्ष करणारा नाग; व्हिडीओ व्हायरल

दरम्यान मंगळवारी दत्ता हा काकाच्या दुकानात होता. यावेळी सामान घेण्यासाठी तो जिन्याच्या जवळ गेला. यावेळी त्याला अचानक सर्प दंश झाला. ही बाब घरातल्या लोकांना कळताच त्याला तात्काळ खाजगी रुग्णांना दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना सायंकाळी त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. कुटुंबियांनी घाटी रुग्णालय परिसरामध्ये टाहो फोडला आहे. याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक फौजदारी एम. डी. निळ करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here