मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय आता कूपर रुग्णालयाच्या डॉक्टरांना नोटिस पाठविण्याची शक्यता आहे. शवविच्छेदन अहवालातील त्रुटींबद्दल सीबीआय असा निर्णय घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सुशांतसिंहच्या मृत्यूच्या तपासासाठी मुंबईत दाखल झालेल्या सीबीआयच्या विशेष पथकाने कूपरच्या डॉक्टरांची चौकशी करुन त्यांचा जबाब नोंदवला होता. त्यांनी केलेल्या सुशांतसिंहच्या शवविच्छेदनात त्रुटी असल्याचे पथकाच्या तपासात समोर आले आहे. यामुळेच आता सीबीआयकडून या डॉक्टरांना नोटिस बजावली जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. कूपर रुग्णालयाने शवविच्छेदनात सुशांतसिंहच्या मृत्यूची वेळ नोंदवलेली नाही. तसेच या शवविच्छेदनाआधी त्याची करोना तपासणीही करण्यात आलेली नाही. यामुळेच संशय निर्माण झाल्याचे सीबीआयच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, टाइम्स नाऊट्या रिपोर्टनुसार, सुशांतच्या मृत्यूचा नारकोटिक्सशी संबंध असल्याचं वृत्त समोर येत आहे. रियाच्या चॅट्सचे काही स्क्रीनशॉट मिळाले आहेत. हेच चॅट रियाने काही दिवसांपूर्वी डिलीट केले होते. पण आता ते पुन्हा मिळवण्यात आले आहेत. रिया आणि गौरव आर्य यांच्यात अंमली पदार्थाबद्दल चॅट झाल्याचं या व्हॉट्सअॅप मेसेजवरून दिसत आहेत. गौरवची ओळख एक ड्रग डीलर म्हणून आहे. या चॅटमध्ये लिहिले आहे की, ‘जर तू हार्ड ड्रग्जबदद्ल बोलत असशील तर मी कधीही जास्त ड्रग्जचा वापर केलेला नाही.’ रियाने ८ मार्च २०१७ मध्ये गौरवला हा मेसेज पाठवला होता. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सुशांतच्या मृत्यू मागे ‘ड्रग्सचा कट’ रचल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. आता सुशांतसिंह प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (
) गुन्हा दाखल केला आहे. ‘ड्रग्सचा कट’ पाहता NCBने सुशांतच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने 20, 22, 27, 28, 29 नारकोटिक ड्रग्स अॅण्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्री रियासह तिच्या साथीदारांविरोधात हा गुन्हा दाखल केला गेला आहे. रिया विरोधात गुन्हेगारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ईडीच्या एफआयआरमध्ये ज्यांची ज्यांची नावं होती त्यांच्याविरूद्ध एनसीबीने गुन्हा दाखल केला आहे. यात रियाच्या भावासह इतरांचाही समावेश आहे. या प्रकरणी आता
, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, जया साहा, श्रुती मोदी आणि पुण्याचा गौरव आर्य आणि इतर ड्रग्स डिर्लसचे रेकॉर्ड तपासले जाणार आहेत. दिल्लीतील NCB चे ऑपरेशन्स युनिट हे मुबंतील मुंबईतील एनसीबीसोबत मिळून सुशांत प्रकरणात ड्रग्स अँगलची चौकशी करणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here