पाकिस्तानचा फलंदाज सौद शकील याने त्याच्या करिअरच्या पहिल्या ७ कसोटीत ७ वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी आजवर कोणत्याही फलंदाजाला करता आलेली नाही. लंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात त्याने ५७ धावा केल्या आणि हा विक्रम केला.
सौदने करिअरच्या पहिल्या कसोटीत ७६ आणि ३७ धावा केल्या होत्या. दुसऱ्या कसोटीत ६३ आणि ९४ धावा, तिसऱ्यात २३ आणि ५३, चौथ्या कसोटीत २२ आणि ५५ धावा केल्या होत्या. त्यानंतर सौदने करिअरच्या पाचव्या कसोटीत नाबाद १२५ आणि ३२ धावांची खेळी केली. सहाव्या कसोटीत नाबाद २०८ आणि ३० तर आता सातव्या कसोटीत ५७ धावांची खेळी केली.
शकीलच्या पहिल्या ७ कसोटीमधील धावा
पहिली कसोटी- ३७ आणि ७६
दुसरी कसोटी- ६३ आणि ९४
तिसरी कसोटी- २३ आणि ५३
चौथी कसोटी- २२ आणि नाबाद ५५
पाचवी कसोटी- नाबाद १२५ आणि ३२
सहावी कसोटी- नाबाद २०८ आणि ३०
सातवी कसोटी- ५७ धावा
दुसऱ्या कसोटीवर पाकिस्तानची पकड असली तरी दोन सामन्यांच्या या मालिकेतील पहिली कसोटी श्रीलंकेने जिंकली आहे. दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेचा पहिला डावा फक्त १६६ धावांवर संंपुष्ठात आला होता. त्यानंतर पाकिस्तानने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ५ बाद ५३६ धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडे ३९७ धावांची आघाडी आहे.