जोधपूर: राजस्थानमधून एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. मुलीने प्रेमविवाह केला म्हणून येथे एका जोडप्याने आपलं आयुष्य संपवलं आहे. मुलीच्या आई-वडिलांनी ट्रेनसमोर उडी घेत जीव दिला. यासोबतच त्यांनी आत्महत्येचे कारणही एका पत्रात लिहून ठेवले आहे. त्यांच्या मुलीने प्रेमविवाह केल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. यामुळे दु:खी होऊन त्यांनी हे पाऊल उचलले. या घटनेत रेल्वेची धडक बसल्याने दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनास्थळी दोघांच्याही मृतदेहाचे तुकडे आढळून आले. माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पाली येथील बांगर रुग्णालयाच्या शवागारात ठेवला.

अशोक व्यास (वय ५५) आणि त्यांची पत्नी मीना व्यास (वय ५०) असं या दाम्पत्याचं नाव आहे. जोधपूर इंदूर एक्स्प्रेस ट्रेनपुढे उडी घेत या दोघांनी जीव दिला. या दुर्घटनेनंतर जोधपूर-इंदूर एक्स्प्रेस १ तास थांबली होती. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. जिथे त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयाच्या शवागारात ठेवला.

नको जाऊ गं… बापाने पाया पडल्या, विनवण्या केल्या, पण त्या निष्ठुर पोरीने काही ऐकलं नाही, अन्… पाहा VIDEO
मिळालेल्या माहितीनुसार, मृत अशोक व्यास यांच्या (२२) वर्षीय मुलीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे त्यांनी प्रेमविवाह केला. त्यानंतर गेल्या सोमवारी ते एसपींसमोर हजर झाले आणि त्यांनी त्यांच्या सुरक्षेची विनंती केली. यावेळी अशोक व्यास आणि त्यांची पत्नीही उपस्थित होते. त्यांनी आपल्या मुलीला खूप समजावलं. पण, त्यांच्या मुलीने त्यांचं ऐकलं नाही. त्यानंतर पोलिसांनी तरुणीला प्रियकराला सोपवलं. मुलीच्या या वागण्याने या अशोक आणि मीना यांना खूप वाईट वाटले. यामुळे दुखावलेले पती-पत्नी दोघेही घराला कुलूप लावून मंगळवारी जोधपूर रोड ओव्हर ब्रिजखाली पोहोचले. जिथे त्याने जोधपूर इंदूर एक्सप्रेस ट्रेनसमोर उडी मारून आपला जीव दिला.

एसपीसमोर तरुणीचा भाऊ गौरव (वय २५) हा देखील उपस्थित होता, त्यानेही बहिणीला समजावण्याचा प्रयत्न केला. पण, ती ऐकली नाही. यामुळे तो इतका दुःखी झाला होता की तो डिप्रेशनमध्ये गेला होता. मुलीच्या प्रेमविवाहामुळे संपूर्ण कुटुंब अस्वस्थ झालं. यानंतर दाम्पत्याने आपल्या मुलाला नातेवाईकाच्या घरी पाठवले. त्यानंतर त्यांनी आपलं आयुष्य संपवलं. या घटनेनंतर गौरवचा फोनही लागत नाहीये. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

प्रेमात अडथळा, आईसोबत सतत भांडण; मुलीनं आई अन् प्रियकराच्या मदतीने वडिलांचा काटा काढला

पोलिसांना घटनास्थळी जोडप्याने लिहून ठेवलेलं पत्रही सापडलं. ‘माझ्या मुलीने दुसऱ्या जातीतील मुलासोबत प्रेमविवाह केला आहे. यामुळे मी, माझी पत्नी आणि मुलगा खूप दुःखी आहोत. मुलीने असे पाऊल उचलल्याने आम्ही हे पाऊल उचलत आहोत. आमचा मुलगा गौरव खूप चांगला आहे. त्याला खूप यश मिळावं ही देवाच्या चरणी प्रार्थना. माझा भाऊ आणि वहिनी माझ्या लाडक्या मुलाची काळजी घेतील अशी अपेक्षा करतो. आमचे आशीर्वाद सदैव त्याच्या पाठीशी असतील. पोलिसांनी त्याला त्रास देऊ नये’, असं त्यांनी त्यांच्या पत्रात लिहिलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here