मुंबईः करोनाचा संसर्गापासून बचावासाठी ‘मालेगाव पॅटर्न’ काढा घेण्याचे आवाहन केले गेले. मात्र नागरिकांनी हा काढा घेताना त्याच्या प्रमाणाचा विचार केला नाही. या काढ्याच्या अतिसेवनाने आता अनेकांना मुळव्याधीचा आणि पोटासंबंधीचे त्रास सुरू झाले आहेत. हा काढा उष्ण असल्याने त्याच्या अतिसेवनाचे परिणाम समोर आले आहेत.

मालेगाव काढ्याची सामग्री आणि तो तयार करण्याची प्रक्रिया व्हॉट्सअ‍ॅपवर पाहून अनेकांनी तो घरी बनवला. व्हॉट्सअॅपवर हा काढा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यानंतर दुकानदारांनी मालगेवा काढ्याचे मिश्रण विकायला सुरवात केली. हा काढा घ्याच, असे मेसेजही जोरदार व्हायरल झाले. या मागे प्रामाणिक प्रयत्न असले तरी तो घेण्याचे प्रमाण आणि त्याचा योग्य प्रसार करण्यात मात्र अनेक जण विसरले.

मालेगाव काढ्याला सरकारची किंवा सरकारच्या कुठल्याही संस्थेने अधिकृत मंजुरी दिलेली नाही. मालेगाव काढ्याच्या सेवनाने कोरानाचा संसर्ग झालेला नाही याचे कुठलेही पुरावे किंवा तथ्य समोल आलेले नाहीत. यामुळे जाहिरपणे सूचवणं आणि पुरेशा माहितीच्या अभावामुळे नागरिकांना या काढ्याच्या अतिसेवनाने मुळव्याधीसारखे आजार उद्भवू लागले आहेत.

श्वसनसंस्थेशी संबंधित असलेल्या करोना या आजारासाठी काढा पोटात घ्यावा लागतो. तो अतिप्रमाणात आणि सतत सेवन केल्यास आतड्यांना काढा पचवण्यासाठी जास्त परिश्रम करावे लागतात. यातून निर्माण होणारी उष्णता शरीरात संतुलीत झाली नाही तर त्याचे विपरित परिणाम पचनसंस्थेवर होतात. हायपरअ‍ॅसिडिटी, मुळव्याध, पोटासंबंधीचे इतर आजार होऊ शकतात, असं या क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात येतंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here