मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपले असून राज्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हे लक्षात घेता मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना आज (२७ जुलै रोजी) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर, रायगडला ऑरेंज अलर्ट असून रायगड जिल्ह्यासह परिस्थितीनुसार जिल्हा प्रशासन निर्णय घेणार आहे. तर, पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व सरकारी, खासगी शाळा, सर्व महाविद्यालये, सर्व आश्रमशाळा, व्यवसाय आणि प्रशिक्षण केंद्रांना आज २७ जुलै रोजी सुट्टी जाहीर.

मुंबईसह ठाणे, रत्नागिरी आणि चंद्रपुरात पावसाची स्थिती पाहता अतिवृष्टी विचारात घेऊन आणि हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अतिवृष्टीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिली ते १२ वीच्या सर्व माध्यमांच्या आणि मंडळांच्या शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ शकते. याचा विचार करून शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या जिल्ह्यांमधील सर्व शाळांना आज दिनांक २७ जुलै रोजी सु्ट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदांनी जाहीर केले आहे.

कुटुंबीयांनी मुलीचे लग्न दुसरीकडे जुळवले, प्रियकर भडकला, होणाऱ्या नवऱ्यावर केला हल्ला
मुंबईत सुट्टी जाहीर

भारतीय हवामान खात्याने मुंबई महानगराला काल रात्री ८ ते आज दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना उद्या गुरुवार दिनांक २७ जुलै २०२३ रोजी सुटी जाहीर केली आहे.

तसेच, सर्व मुंबईकर नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

रत्नागिरीत सुट्टी जाहीर

रत्नागिरी जिल्हयाला देखील पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्याच आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच संगमेश्वर येथील शास्त्री नदी, त्याच प्रमाणे राजापूरच्या कोदवली नदीनेही इशारा पातळी ओलांडलेली आहे.

भेटीसाठी आलेले बराच वेळ ताटकळले, पण दिलीप वळसे पाटील यांनी या कृत्याने सर्वांची जिंकली मने
ही स्थिती लक्षात घेता येथे अतिवृष्टी झाल्यास पूराची स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच कारणामुळे रत्नागिरी जिल्ह्यात शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Dilip Shanghvi : पायपीट करत विकायचे औषधे, २००० रुपये कर्ज घेऊन सुरू केली कंपनी, आज २६०००० कोटींचा व्यवसाय
चंद्रपूरमध्ये सुट्टी जाहीर

चंद्रपूर जिल्ह्यासाठी हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. हे लक्षात घेत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज २७ जुलै रोजी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. आपत्कालीन परिस्थिती आणि अनुचित घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here