पुणे : येरवडा कारागृहातील रक्षकाने विवाहानंतर आठवडाभरात स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवल्याचं कारण उघडकीस आलं आहे. प्रेमप्रकरणातून रक्षकाने आपलं आयुष्य संपवल्याचं तपासात उघडकीस आले असून, या प्रकरणी येरवडा पोलिसांनी प्रेयसीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अमोल मुरलीधर माने (वय २८) असे कारागृह रक्षकाचे नाव आहे. माने याच्या मृत्यूस जबाबदार असल्याप्रकरणी पल्लवी दिनकर धुमाळ (रा. येरवडा कारागृह वसाहत) दिनकर रंगोबा धुमाळ (वय ५७, रा. विजय पार्क, विद्यानगर), प्रतीक दिनकर धुमाळ, रोहिदास मुरलीधर निगडे (वय ५२), सोहम निगडे, रोहित साहु लॅबवाला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक भगवान गुरव यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवडा कारागृहात २७ फेब्रुवारी रोजी कारागृह रक्षक अमोल माने याने स्वत:वर गोळी झाडून आपलं आयुष्य संपवलं होतं.

Red Alert for Heavy Rain : पावसाचा रेड अलर्ट, मुंबईसह या ४ जिल्ह्यांमध्ये आज शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल आणि पल्लवी यांचे प्रेमसंबंध होते. पल्लवीने त्याला विवाहास नकार दिला होता. त्यानंतर पल्लवी आणि नातेवाईक त्याला धमकावत होते. ‘तुझ्याविरुद्ध तक्रार केल्यास तू निलंबित होशील,’ अशी भीती त्याला दाखवली होती.

अशी घडली घटना…

अमोलचा जानेवारी महिन्यात विवाह झाला. विवाहानंतर तो कारागृहात रुजू झाला, तेव्हा पल्लवी आणि नातेवाईकांनी त्याला पुन्हा धमकवायला सुरुवात केली. ‘तू विवाह कसा केला,’ अशी विचारणा करून ‘तुझी बदनामी करतो,’ असे सांगून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची धमकी त्याला देण्यात आली. २७ फेब्रुवारी रोजी पहाटे बंदोबस्तास असलेल्या अमोलने कारागृहात स्वत:वर बंदुकीतून गोळी झाडून स्वत:ला संपवलं. तत्पूर्वी त्याने मोबाइलवर संदेश लिहिला होता. पोलिस निरीक्षक कांचन जाधव तपास करीत आहेत.

शरद पवार समर्थक १७ आमदारांचा प्रश्न, पक्षात नेमके काय सुरू आहे, भाजपला पाठिंबा देणार का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here