मुंबई : सरकारने छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आधार आणि पॅन क्रमांक अनिवार्य केला आहे. या दोन कागदपत्रांशिवाय सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPP), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), सुकन्या समृद्धी योजना (SSY), महिला सन्मान योजना यासारख्या इतर लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करता येणार नाही. अशा परिस्थितीत ज्यांनी अद्याप सुकन्या खाते पॅन आणि आधारशी लिंक केलेले नाही त्यांनी ते तात्काळ करणे आवश्यक आहे. अन्यथा खाते गोठू शकते.

आधार सादर करणे आवश्यक
वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेमध्ये म्हटले आहे की गुंतवणूकीसाठी खाते उघडताना पॅन आणि आकार कार्ड देणे आवश्यक आहे. सुकन्या समृद्धी योजनेच्या गुंतवणूकदाराने ३१ मार्च २०२३ पूर्वी खाते उघडले असेल आणि त्याचा आधार क्रमांक खाते कार्यालयात जमा केला नसेल, तर त्यांनी आधार क्रमांक संबंधित कार्यालयात जमा करणे अनिवार्य असून आधार जमा करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२३ आहे. सुकन्या खातेधारक आधारसोबत पॅन देखील जमा करू शकतात.

कार लोनचे हप्ते थकलेत? वसुली एजंटने गाडी उचललीय? ग्राहक म्हणून तुमचे अधिकार जाणून घ्या
SSY खाते आधारशी लिंक नसेल तर…

अर्थ मंत्रालयाच्या सूचनेनुसार, दिलेल्या मुदतीत सुकन्या समृद्धी योजना खात्याशी आधार क्रमांक लिंक न केल्यास खाते गोठवले जाईल. अशा परिस्थितीत गुंतवणूकदाराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. व्याजाची रक्कम सुकन्या खातेदाराच्या खात्यात जमा केली जाणार नाही. त्याच वेळी सुकन्या खातेदार देखील हप्ता जमा करू शकणार नाहीत. तर सुकन्या समृद्धी योजनेच्या परिपक्वतेवर खातेदाराच्या बँक खात्यात रक्कम हस्तांतरित केली जाणार नाही.

ऑगस्टमध्ये सणच सण! १४ दिवस बंद राहणार बँका; खोळंबा टाळण्यासाठी आधीच वाचा सुट्ट्यांची यादी
सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर
मुलींच्या शिक्षणाची आणि लग्नाची चिंता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना (SSY) सुरू केली आहे. ही पूर्णपणे सरकारी योजना आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या मुलींना भविष्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत गुंतवणूक केल्यावर, सरकार जमा केलेल्या रकमेवर वार्षिक आधारावर ८% व्याजदर देते. सुकन्या योजनेअंतर्गत १० वर्षांची मुलगी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकते. योजनेत तुम्ही वार्षिक आधारावर २५० रुपये ते १.५ लाख रुपये जमा करू शकता. या योजनेअंतर्गत जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला आयकराच्या कलम ८०सी अंतर्गत सूटही मिळते.

लॉक-इन कालावधी

या योजनेचा लॉक-इन कालावधी २१ वर्षांचा आहे म्हणजेच तुमचे खाते २१ वर्षांत परिपक्व होईल. अशा परिस्थितीत तुम्ही मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढू शकत नाही. यादरम्यान तुम्ही पैसे काढले तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. तथापि, मुलगी १८ वर्षांची झाल्यावर शिक्षणासाठी ५०% रक्कम काढता येते. त्याच वेळी खातेदारांचा अचानक मृत्यू झाल्यास मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढता येतात. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला संपूर्ण २१ वर्षे पैसे जमा करावे लागणार नाहीत. खाते उघडल्यापासून १५ वर्षांसाठीच पैसे जमा करावे लागतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here