पालघर: खवळलेल्या समुद्रात मासेमारी करणे दोन तरुणांना चांगलेच भोवले आहे. समुद्रात मासेमारीसाठी दोन तरुण घेऊन गेलेली छोटी बोट पलटल्याने मोठी दुर्घटना डहाणू परिसरात घडली आहे. मासेमारीसाठी गेलेल्या दोन तरुणांपैकी एक तरुण पोहत समुद्रकिनाऱ्यावर आला. तर, दुसऱ्या तरुणाचा मात्र बुडून मृत्यू झाला असून भूपेंद्र अंभिरे असे मृत तरुणाचे नाव आहे.

पालघर जिल्ह्यासह राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत असून समुद्र देखील खवळलेला आहे. समुद्र किनारी जाण्यासही नागरिकांना मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे १ जून ते ३१ जुलै हा ६१ दिवसांचा मासेमारी बंदी कालावधी असून या काळात मासेमारी करण्यास मनाई आहे. मात्र, असे असताना देखील नको ते धाडस करून डहाणू-मागीलवाडा येथील रहिवासी असलेले भूपेंद्र अंभिरे आणि संजय पाटील हे दोन तरुण छोटी बोट घेऊन समुद्रात मासेमारीसाठी गेले होते.

Maharashtra Weather: राज्यासाठी पुढील ४ तास महत्त्वाचे, मुंबई-पुण्यासह या जिल्ह्यांसाठी मोठा अलर्ट, वाचा सर्व अपडेट
मुसळधार पाऊस सुरू असल्याने आणि समुद्र खवळलेला असल्याने अचानक काही गेल्यावर ही बोट समुद्रात पलटली. बोट पलटल्याने बोटीतील संजय पाटील हा तरुण पोहत कसाबसा समुद्रकिनाऱ्यावर आल्याने त्याचा जीव वाचला. त्यानंतर या घटनेची माहिती स्थानिक पोलीस प्रशासन व तटरक्षक दलाला देण्यात आली. भूपेंद्र अंभिरे हा तरुण बेपत्ता असल्याने त्याला शोधण्यासाठी शोध मोहीम हाती घेण्यात आली.

Maharashtra Weather Update: मोठी बातमी! मुंबईला रेड अलर्ट, मुसळधार पाऊस बरसणार, राज्यात कुठे काय परिस्थिती
तटरक्षक दलाच्या जवानांनी हेलिकॉप्टरच्या मदतीने बेपत्ता तरुणाचा शोध सुरू केला. मात्र बेपत्ता तरुणाचा शोध लागला नाही, त्यानंतर समुद्राच्या लाटांसोबत वाहत आलेला भूपेंद्र अंभिरे या तरुणाचा मृतदेह समुद्रकिनारी आढळून आला.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here