पाकिस्तानच्या रेस्क्यू ११२२ च्या प्रवक्त्याने बुधवारी सांगितले की ५० वर्षीय भारतीय नागरिक मूकबधिर आहे आणि सांकेतिक भाषेतून संवाद साधतो. त्याच्या हातावर बनलेला टॅटू पाहून ती व्यक्ती हिंदू असल्याची ओळख पटली आणि पुराच्या पाण्याने त्याला येथे वाहून आल्याचं कळालं.
कसूरपासून लाहौर ७९ किमी दूर आहे
बचाव पथकाच्या प्रवक्त्याने सांगितले की, मंगळवारी लाहौरपासून सुमारे ७० किमी अंतरावर पंजाबमधील कसूर जिल्ह्यातील गंडा सिंग वालाजवळ ही व्यक्ती सतलज नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेला आणि थेट पाकिस्तानात पोहोचला. वैद्यकीय तपासणीनंतर त्या व्यक्तीला तपासासाठी गुप्तचर यंत्रणेकडे सोपवण्यात आले आहे.
हिंदी भाषेत आहे टॅटू
डॉन वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, या व्यक्तीच्या उजव्या हातावर हिंदी भाषेतील एक स्क्रिप्ट टॅटू आहे. त्यात त्या व्यक्तीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे म्हटले आहे. अलीकडेच सतलज नदीला आलेल्या पुरामुळे गंडा सिंग वाला आणि जवळपासची अनेक गावे बाधित झाली होती. पंजाब सरकारच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवड्यात चिनाब नदीला आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील ४० गावांसह अनेक परिसर बुडाले, ४८,००० हून अधिक लोक प्रभावित झाले आहेत.